सांगली ; प्रतिनिधी
*महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी,आणि सिद्धार्थ भोकरे यांना पोलीस संरक्षण द्यावं-सांगली पोलीस अधीक्षकां कडे निवेदना द्वारे केली मागणी.*
दैनिक जनप्रवास मध्ये दिनांक 15 मे रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी दैनिक जनप्रवास मधून असे म्हटले होते की, पाकिस्तान मधील क्रिकेट खेळाडू जसे पाकिस्तान प्रेम दाखवतात तसे प्रेम बॉलीवूडमधील खान बंधू अभिनेते आपल्या देशाबद्दल उघडपणे भारत प्रेम का दाखवत नाही..? आपण देखील भारताच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत असे खान बंधूंनी देखील देशप्रेम दाखवायला हवं होतं….? असे वृत्त प्रसिद्ध होताच काही अज्ञात इसमांनी निनावी पत्राद्वारे, “तू आठ दिवसात माफी माग अन्यथा तुला गोळीबार करून उडवून देऊ” अशी धमकी दिली आहे. या धमकीचा सांगलीतील सर्व पत्रकारांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे, आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, डिजिटल मीडिया प्रदेश अध्यक्ष माननीय सिद्धार्थभाऊ भोकरे यांच्या जीवितास धोका असल्याने,
सिद्धार्थभाऊ भोकरे यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे आणि
सिद्धार्थजी भोकरे यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी,
अश्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना डिजिटल मीडिया,सांगली जिल्ह्याच्या वतीने, सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना दिले आहे.
धमकी देणाऱ्या वर त्वरित कारवाई न झाल्यास राज्यातील सर्व पत्रकार तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल/ प्रिंट मीडिया जिल्हा सांगली यांच्या वतीने,सांगली जिल्ह्यात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी पत्रकार यांनी दिला आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,डिजिटल,मीडिया सांगली जिल्हा अध्यक्ष राहुल मोरे,जिल्हा कार्याध्यक्ष
राजेंद्र कांबळे,मुंबई वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी पत्रकार संघटना- सांगली जिल्हा अध्यक्ष रवींद्र कांबळे,
जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत लोंढे,
मिरज तालुका अध्यक्ष मल्हारी ओमासे,विजय धुमाळ,अमन पटेल, शाहीन शेख,पूर्वा गरग,कवठेमहंकाळ तालुका अध्यक्ष कुणाल कोठावळे,प्रज्ञा म्हेत्रे,मयुरी देशपांडे, अबीद शेख,मनोज कांबळे, प्रमोद माळी,निरंजन कुलकर्णी,किरण काटे, सलीम अत्तार उपस्थित होते.

