अर्धापूर(प्रतिनिधी)
अर्धापूर तालुक्यात दिनांक नऊ रोजी मृग नक्षत्राच्या वादळी वाऱ्याने व पावसाने तालुक्यातील केळी व पपईच्या बागा उध्वस्त केल्या. तोंडाशी आलेला खास निसर्गाने अचानक हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे अतोनात लाखो रुपयांचे नुकसान झाले. खासदार अशोकराव चव्हाण व या भागाच्या आमदार श्रीजयाताई चव्हाण यांनी प्रशासनाला दिल्या पंचनामे करण्याची सूचना.
अर्धापूर तालुक्यातील केळी राज्यासह भारतभर प्रसिद्ध असून अर्धापूर येथून जवळपास देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात केळीचा पुरवठा केला जातो. तसेच परदेशातही या भागातून केळी निर्यात केली जाते. या भागात केळीचे मोठ्या प्रमाणे पीक घेतले जाते. जवळपास एक वर्ष लहान लेकरासारखा सांभाळ केल्यानंतर केळीचा पीक हाती येतो. पावसाळा सुरू होताच केळीच्या बागा पण सुरू होतात कापणीस येतात. केळीला एप्रिल महिना व मे महिन्याचा उन्हाचा तीव्रता सहन होत नाही म्हणून शेतकरी खालील जमीन नेहमी ओली राहिल याची दक्षता घेतो. एप्रिल आणि मे महिना निघाला की केळी कापणीस येते, हाताला येते. बाजारात अर्धापुरी केळीची मागणी मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे योग्य भाव मिळतो. यावर्षी एप्रिल महिन्यात सर्वसाधारण तापमान होते व मे महिन्यात तापमानात घट झाली आणि काही प्रमाणात पावसाळा सारखे वातावरण झाले होते त्यामुळे त्याचा फायदा केळीला झाला होता. सगळ्या शेतकरींची आशा लागलेली ती आता या वेळेस केळी चांगले आल्यात आणि मार्केटला भाव सुद्धा खूप चांगला आहे पण निसर्गाने दिनांक ९ रोजी सायंकाळी तालुक्यात हाहाकार माजवला.. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. वादळी वारे चक्रीवादळासारखे होते मोठ्या प्रमाणात पावसाच्या सऱ्या होत्या आणि बघता बघता सगळ्या केळी जमीनदोस्त झाल्या. निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास हिरावून घेतला.
या भागाचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी भोकर मतदारसंघातील तिन्ही तहसीलदारांना तातडीने संपर्क साधून आवश्यक त्या सूचना दिल्या व पंचनामा करण्याचे आदेश दिले व लोकप्रिय आमदार श्रीजयाताई चव्हाण यांनी संबंधित प्रशासनाला पंचनामे करून अहवाल देण्यास सांगितले व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
दिनांक १० रोजी उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाल व तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, प्रभारी किशोर स्वामी, तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, शहराध्यक्ष योगेश हाळदे, नगराध्यक्ष प्रवीण देशमुख, राजेश्वर शेटे, कृऊबाचे संचालक निळकंठराव मदने,डॉ. लक्ष्मण इंगोले, माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, व्यंकटी राऊत, बाळू पाटील धुमाळ, राजकुमार जाधव, राजाराम पवार, शंकरराव ढगे यांच्या उपस्थितीत अर्धापुर तालुक्यातील शेनी, पार्डी(म), देळुब,पांगरी, कारवाडी, लोण, लहान,आंबेगाव, चेनापूर,पाटनूर, कोंढा,गावांची पाहणी करून अहवाल शासनाला पाठवण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी व संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांनी केले.

