मी वडाला कधीही फेरे मारले नाही ना तिथे जाऊन पूजा केली पण कायम मनोमन पुजत आले ते निसर्गाला आणि त्या सृष्टीच्या निर्मात्याला.. लहानपणापासून वडाची आणि इतर अनेक झाडे लावली आहेत..लहानपणी आजीने हरितालिका व्रत दिले होते त्याचं कारण म्हणजे नवरा चांगला मिळावा.. चांगला या शब्दाचा अर्थ प्रत्येकीचा वेगळा आहे.. बऱ्याच जणीना श्रीमंत पैसेवाला म्हणजे चांगला वाटतो.. कोणाला दिसायला रुबाबदार, देखणा म्हणुन चांगला वाटतो तर कोणाला अजून काही.. पण याचा संबंध आपल्या आधीच्या अनेक जन्मांशी असतो ..आपल्या कर्मानुसार तशी व्यक्ती आपल्या संपर्कात येते आणि संसार सुरु होतो..
आज अनेक मित्रांना मी मैत्रीण म्हणुन आवडते .. मित्र म्हणुन मलाही ते आवडतात पण त्यातला एकही नवरा म्हणुन कधीही आवडला नसता याला दोन महत्वाची कारणे आहेत..
एक म्हणजे सचिन देत असलेलं स्वातंत्र्य इतर कुठलाही पुरुष देउ शकत नाही.. त्याच्या इतकं मोठं मन कोणाचही नाही.. मला वाटतं एका स्त्रीला घडण्यासाठी याची खूप गरज आहे..
आणि दुसरं म्हणजे तो माझ्या मित्रांना देत असलेला आदर , आणि त्यांनाही त्याने त्याचे मित्र म्हणुन जवळ केलय या फक्त दोनच गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या आहेत..
शिक्षण , निर्व्यसनी , उत्तम प्रामाणिक माणूस , हुशार ,अनेक कलागुणांनी समृद्ध या सगळ्या क्वालीटीज त्याच्याकडे आहेतच पण वरच्या दोन गोष्टीपुढे त्या फिक्या पडतात..
सोशल मिडीयावरच्या त्याच्या कुठल्याही मैत्रीणीने येउन सांगावं कि तो फ्लर्ट करतो हे कदापि शक्य नाही..कुठल्याही स्त्रीच्या इनबॉक्सात जाऊन तो मेसेजेस करणार नाही.. पुरुषांनी स्त्रीशी कसं वागावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे सचिन गोडबोले.. प्रचंड मैत्रीणी असून कधीही फालतूगिरी नाही उलट स्त्रीबद्द्ल आदर आणि घरातही वेळ पडली तर सगळी कामे करतो आणि कधीही माझ्याबद्दल एकही तक्रार नाही..
२८ वर्षांपुर्वी सचिनला प्रपोज करुन मी जुगार खेळले होते आणि तिथे मी जिंकले .. अनेक चढउतार पाहिले पण त्याचा दोष ना नशिबाला दिला ना कोणाला.. प्रत्येक वेळी एक नवीन आव्हान म्हणुन स्विकारलं आणि म्हणुनच कदाचित २८ वर्षानंतरही आम्ही नवरा बायकोपेक्षा मित्र म्हणुन रहातो.. जेव्हा मी त्याला प्रपोज केलं तेव्हा त्याच्याकडे १४०० रुपयाची नोकरी सोडली तर सायकलही नव्हती.. ना घर , ना बॅकबॅलंस , ना सोनंनाणं.. तो आजही अनेकदा म्हणतो , अगं मुली किती काय काय पहातात पण तु माझ्यात काय पाहिलस ? मीही यावर हसते आणि म्हणते , तेव्हा या गोष्टी पाहिल्या असत्या तर कदाचित प्रेम नसतं केलं.. कारण भौतिक गोष्टी दिसायला लागल्या कि प्रेम धुसर होतं.. माणूस त्यालाच प्रेम समजतो आणि आनंदाला मुकतो..
उत्तम पार्टनर मिळायला जितकं नशीब लागतं तितकच ते टिकवायला प्रचंड ताकद लागते.. गुणदोष स्विकारताना आपला कस लागतो.. दोघेही १००% योग्य आहोत का तर अजिबात नाही पण मी एक गोष्ट माझ्या आईकडून शिकले ती म्हणजे मौनम सर्वार्थ साधनम.. सचिन रागीट आहे आणि मला अजिबात राग येत नाही त्यामुळे भांडण होत नाही .. अगदी साधी धुसफूसही नाही.. कदाचित असं एकही कपल नसेल पण गप्प रहाण्यासाठी लागणारी ताकद मला अध्यात्मामुळे सहज शक्य झाली आहे आणि त्याचा फायदा मला सगळ्या नात्यात होतो.. हे कदाचित आधीच्या अनेक जन्मांचं फळ असेल जे कृष्णभक्तीने मला सहज मिळालय..
रोज नवनवीन विषय हाताळताना आज वटपौर्णिमा निमित्ताने मला सचिनवर लिहून त्याची कृतज्ञता व्यक्त करावी वाटली.. त्याच्या जागी दुसरा कोणी असतो तर तुम्हाला अशी सोनल दिसलीच नसती हे सत्य आहे.. आपल्या कर्मानुसार आपल्याला योग्य ते तो देतोच.. कृष्णा तुसी ग्रेट हो इतकच मी म्हणेन..माझ्या कृष्णाची कृतज्ञ आहे.. (अगदी आताच शिऱ्याची डिश हातात आली आणि जाणवलं , श्रीमंती आणि सुख यापेक्षा वेगळं नसावं..)https://www.facebook.com/sonal.s.godbole
https://www.instagram.com/godbolesonal?igsh=Y3dvazd0Y3UzcW84
https://youtube.com/@sonalcreations2874?si=jP6Ft3TECNOcUi_n
#SonalSachinGodbole
#Reel_Master
#YouTuber
#Publishersonalcreations
#कुंपणावरचासरडाकादंबरी, #कामिनीकादंबरी, #सहजसोप्पं, #संस्कारवेल, #मुलीची आई, #नैराश्यातुनसकारात्मकता, #आईमुलगानातंसंस्कार , #सखी,
#अध्यात्मआणिगैरसमज, #एक सुंदर सत्य
#AnimalCommunicator
#SonalCreations – my YouTube channel
#SexEducation as a counselor
#ProudToBeATranswoman – book
#Beyondsex – novel
#Fantasies_And_Beauties_In_Sex – novel
#Anira – novel
#Indradhanu – book
#13000km – my life journey book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marital_affairs
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi – चारोळ्यासंग्रह
#Abhisarika – काव्यसंग्रह
#Counselor
#Nutritionist

