
जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत; २१ व्या शतकातील आवाहने पेलणारे शिक्षण आवश्यक – संजय भोसीकर
कंधार, १६- नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबुलगा (ता. कंधार) येथे विद्यार्थ्यांसाठी खास उपक्रम राबवण्यात आला. कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय भोसीकर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. पहिल्या वर्गात नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पहार घालून स्वागतही करण्यात आले. ग्रामिण भागातील विद्यार्थांना २१ व्या शतकातील आवाहने पेलणारे आणि दर्जेदार शिक्षण देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय भोसीकर यांनी केले .
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर संजय भोसीकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली.
या कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य रामभाऊ देवकांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण वाघमारे, आरोग्य अधिकारी डॉ. मुद्दे, मुख्याध्यापक एम.एम. पांचाळ, परिचारिका रणखांब मॅडम, अंगद गुद्दे, रमेश गव्हाणे, पिराजी बिजले, बालाजी देवकांबळे, संतोष देवकांबळे, तेजेश आंबुलगेकर, आदिनाथ, भंडारे यांच्यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार अंगद गुद्दे यांनी मानले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांकडूनही कौतुकाची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.