कंधार ( दिगांबर वाघमारे )
येथे मोहरम ताजिया सन देवसवारी ने उत्साहत हिंदू – मुस्लिम बांधवांनी दि06जुलै रोजी साजरा केला. सदर सन हा हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक मानले जाते .
यात मौला आली सवारी, काशीम दुले,छोटा काशीम दुले, इमाम हुसेन,मोहम्मद हनीफ व नाले हैदर या पाच सवारी सहभागी झाल्या होत्या या सवारी पाच दिवसांपूर्वी बसवल्या होत्या .यात हिंदू देवकर म्हणून प्रसाद पांचाळ,योगेश ताटीपामलवार, शंकर कुलकंटे तर मुस्लिम देवकर रहीम पठाण,मुशरफ शेख,रशीद शेख यांच्या अंगात येते .
मोठी सवारी मौलाअलीचा पुजारी बबलू शेख बारूळकर व काशीम दुलेचा पुजारी मुक्तार पठाण यांच्या नेतृत्वाखाली सण साजरा करण्यात आला.
या उत्सवात माजी सरपंच शंकरराव नाईक,शेख अली,हैदर पठाण,पठाण इरसाल,रफिक शेख,जयराम कांबळे,भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते एस.पी.जाधव ,लक्ष्मण गौंड, शिवाजी वाखर्डे, गोविंद शिंदे, रूकमाजी कोल्हे,युवा नेते शाहरुख खान पठाण,शेख शादुल,पठाण गौस, पठाण साजिद,पठाण असलम,यूनूस लाला शेख, बबलू पठाण,रसूल पठाण ,अकबर सय्यद, मुखीद खान पठाण ,इब्राहिम पठाण ,जुबेर भगवान, सर्वर शेख, रशीद शेख, काशीम पठाण, चांद पठाण, इस्माईल शेख ,सर्वर पठाण आधी बहुसंख्य हिंदू मुस्लिम बंधू भगिनींनी देव स्वारीचे दर्शन घेतले व सहभाग नोंदवला.
सवारी समाप्तीवेळी गावातून निघणाऱ्या आषाढी एकादशी दिंडीचे स्वागत बबलू शेख बारुळकर यांच्यासह समस्त मुस्लिम बांधवांनी केले.यावेळी बारूळ गावचे पोलीस पाटील संजय पाटील जाधव व उस्माननगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलपत्रेवार,पोलीस हवालदार सुखदेव केंद्रे,होमगार्ड भागानगरे यांनी चोख बंदोबस्त केला.(समाप्तीच्या वेळी हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडून आले)

