महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाच्या (माहेड) सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन महाविद्यालय मान्यता प्रणालीचे (New College Permission System – NCPS) उद्घाटन करण्यात आले. या https://htedu.maharashtra.gov.in/NCPS संकेतस्थळावरून इच्छुक संस्थांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री प मंगल प्रभात लोढा, आमदार आशिष देशमुख, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

