कंधार ; प्रतिनिधी
कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघातील धोंड प्रकल्पासाठी ४० कोटी तर किवळा व डेरला उपसिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी ७ कोटीचा निधी उपमुख्यमंत्री मा.ना.श्री #अजितदादा_पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या बैठकीत जलसंपदा मंत्री मा.ना.श्री #राधाकृष्ण_विखे_पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती अशी माहिती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची दिली .
कै.विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत किंवळा व डेरला लिफ्ट सिंचन योजना मंजूर झाली होती, निधी अभावी ही योजना बंद पडली. माझ्या विनंतीवरून या बैठकीत किवळा -डेरला लिफ्ट सिंचन योजनेसह लोअर मानार प्रकल्पाच्या कॅनाल लाईन, अंतेश्वर बंधाऱ्यातून तलाव भरणे, धोंड सिंचन भूसंपादन बुडीत क्षेत्रासाठी ४० कोटी रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला. डेरला उपसिंचन योजनेसाठी 375 HP पंप 1250 KVA ट्रान्सफार्मर, बॅटरी आणि पाईपलाईनची वितरण व्यवस्था VAIVE वदलने, वॉल वदलने आवश्यक होते. तसेच किवळा उपसिंचन योजनेसाठी 200 HP पंच 120 HP चे पंप चालू करणे आणि कॅपेसेटर विद्युत उपकरणे बदलने यातील पाईप लाईनचे दोष दूर करुन सदर योजना त्वरीत कार्यान्वीत करावी असे आदेश अजितदादा पवार यांनी दिले, त्यासाठी 7 कोटी रुपये मंजूर करण्यात आले.
लोअर मानार प्रकल्पाच्या अंतर्गत कॅनालच्या लाईनसाठी यापूर्वी 150 कोटी रुपये देण्यात आले आहेत. या लाइचे काम तात्काळ सुरु करण्या बाबतच्या सुचना दिण्यात आल्या असुन उर्वरीत कामासाठी 150 कोटी रुपयाला मान्यता दिली आहे. लोहा तालुक्यातील अंतेश्वर बंधा-यातून लोहा तालुक्यातील जमीन ओलीता खाली आनन्यासाठी व सर्व तलाव भरुन घेण्याची मागणी केली. पाणी उपलब्ध करुन देण्याच्या संदर्भात सुचनादिलेल्या आहेत. त्यामुहे एंकदरीत लोहा आणि कंधार तालुक्यातील अनेक सिंचनाचे प्रश्न मिटले असुन शेतक-यांची जमिन निश्चितच ओलीताखाली येईल.
सदर बैठकीस अप्पर मुख्यसचिव ओ.पी.गुप्ता, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, जलसंपदा विभागचे सचिव श्री.वेलसरे, माजी आ.मोहनराव हंबर्डे, माजी आ.अविनाशराव घाटे, बाभळी बंधारा कृती समितीचे राजू पाटील रावणगावकर, उपमुख्य सचिव राजेश देशमुख, गोदावरी खो-योच कार्यकारी संचालक श्री.तिरमनवार, उपस्थित होते तर व्हीसीद्वारे जिल्हाधिकरी राहूल कर्डीले, अधिक्षक अभियंता श्री.दाभाडे, श्रीमती संतोषी देवकुळे मॅडम, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर हे उपस्थित होते.
.
.
.
Ajit Pawar Radhakrishna Vikhe Patil Mohanrao Hambarde – मोहनराव हंबर्डे NCPSpeaks_Official

