तालुक्यातील हिंद – कि – चादर श्री.गुरु तेग बहादूरजी साहेब यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त आयोजीत तालुकास्तरावरील चित्रकला स्पर्धेत कु. मात्रिशिका माधव कांबळे सिंदगीकर ही जिल्हा परिषद पेठवडज ता. कंधार जि. नांदेड येथे इयत्ता चौथी मध्ये शिकत असून तिने तालुका स्तरावर चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल गटशिक्षणाधिकारी कंधार यांचेकडून तसेच शाळेकडून तिचे व पालकाचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. कु.मात्रिशिका माधव कांबळे हिचे अनेक स्थरावरून अभिनंदन होत आहे.