राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मागणीला अखेर यश;परीक्षार्थींना क्वेशन बँक पुरवठा करण्याचे सर्व महाविद्यालयांना कुलगुरू चे आदेश

नांदेड ;

गेल्या अनेक महिन्यापासून अंतिम सत्राच्या परीक्षा बाबत केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे परीक्षा होणार का नाही या संभ्रम अवस्थेत विद्यार्थी सापडला होता. परंतु मा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहे राज्य सरकारने ज्या त्या विद्यापीठाला परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्यायचा हा निर्णय त्यांनीच घ्यावा असे सुचवले होते.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने परीक्षा हा एम सी क्यू पद्धतीने ऑनलाईन किंवा ऑफलाईन या कार्य प्रणालीचा उपयोग करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात आले परंतु विद्यार्थ्यांनी अगोदरच्या परीक्षा प्रणाली च्या द्वारे अभ्यास केलेला आहे परंतु विद्यापीठाने एम सी क्यू पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांकडे यांचे एम सी क्यू पद्धतीच्या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची अभ्यासासाठी सामग्री उपलब्ध नव्हती म्हणून विद्यार्थी हा अडचणीत सापडला होता, अनेक विद्यार्थी शिक्षण बाह्य होऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली होती, त्यासाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठामार्फत क्वेशन बँक (Question Bank).
देऊन त्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम, उपाध्यक्ष फैसल सिद्दिकी, सरचिटणीस प्रसाद पवार, रोहित पवार, गजानन शिरसे, गोविंद सकळे यांच्या वतीने कुलगुरू यांच्याकडे दि.12 सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यापीठाचे कुलगुरू यांनी काल एक परिपत्रक काढून सर्व महाविद्यालयांना परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी क्वेशन बँक (Question Bank) त्वरित पुरवठा करावे असे आदेश दिले. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अभ्यास करण्यासाठी खूप फायदा होईल या निर्णयामुळे सर्व विद्यार्थी व पालक आनंद व्यक्त करत आहेत

#नांदेड #Nanded

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *