कंधार तालुक्यातील फुलवळ सर्कल मध्ये शेतकर्यांना हेक्टरी पंचेवीस हजार रुपयेची मदत द्या.

प्रविन पाटिल मंगनाळे यांची मागणी

कंधार (प्रतीनीधी शेख शादुल)

कंधार तालुक्यात फुलवळ सर्कल मध्ये गेल्या आठवड्यापासून सतत 15 दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने या ठिकाणी अतिवृष्टि झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे सोयाबीन , कापुस या पिकांसह ईतर पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे.नुकसानग्रस्त शेतकर्‍यांला हेक्टरी पंचेविस हजार रुपये अनुदान दिले जावे अशा मागणीचे निवेदन फुलवळ सर्कल मधून प्रविन पाटील मंगनाळे मित्र मंडळाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कंधार व तहसिलदार कार्यालय कंधार यांना निवेदन देण्यात आले.


यावेळी प्रविण पाटील मंगनाळे, तुकाराम फुलवळे, नागेश गोधने, रब्बानी शेख, निळकंठ मंगनाळे, अंकित मंगनाळे, विकास डांगे, मैला शेख, शेख उमर, संदीप फुलवळे, समीर शेख, धोंडिबा फुलवळे, शिवप्रसाद डांगे , बालाजी बनसोडे, पत्रकार शादुल शेख, परमेश्वर डांगे आणि गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *