कंधार ; दिगांबर वाघमारे
कंधार तालुक्यात सध्या परतीच्या पावसाने थैमान घातले आहे.तालुक्यातील काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे तालुक्यातील काटकळंबा येथे ते दलित वस्तीत पाणी शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले आहे. याबाबत दिनांक 26 सप्टेंबर रोजी तलाठी संतोष जाधव यांनी सदरील दलित कुटुंबीयांना भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. सदरील पंचनाम्यात या कुटुंबातील जीवनावश्यक वस्तू ज्वारी गहू तांदूळ आदी सह वस्तूंची नासधूस झालेल्या झाली असल्याचे माहीती तलाठी जाधव यांनी दिली.
जवळपास सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद केले असल्याची माहितीही तलाठी संतोष जाधव यांनी दिली आहे. याबाबत कंधार येथील मामा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष मारोती मामा गायकवाड यांनी सदरील गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हालवून प्रशासनाच्या प्रतिनिधीला तलाठी जाधव यांना सदरील घटनेची माहीती देवून तात्काळ पंचनामा करण्याची विनंती केली.
काटकळंबा येथिल सदरील नुकसान झालेल्या कुटूंबांना आर्थिक मदत मिळावी यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले तसेच माननीय तहसीलदार साहेबांनी या दलित वस्तीत पाणी शिरुन झालेल्या नुकसानीचे त्वरित भरपाई म्हणून आर्थिक मदत करावी अशी मागणीही निवेदनाद्वारे तहसीलदार यांना मामा मित्र मंडळ कंदर च्या वतीने करण्यात आली आहे.