अविरत जनसेवा करतेवेळेस आमदार शामसुंदर शिंदे दाम्पत्यांना कोरोना ची लागण !

लोहा;

लोहा ,कंधार मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे लोहा, कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय ,कर्तव्यदक्ष, आमदार श्यामसुंदर शिंदे हे कोरोना पॉझिटिव निघाले असून शुक्रवारी दिनांक 25 रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह मिळाला आहे. आमदार शामसुंदर शिंदे यांच्या सुविद्य पत्नी, सामाजिक कार्य कर्त्या सौ .आशाताई शामसुंदर शिंदे यांना आठ दिवसापूर्वी अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांनी मुंबई येथे तपासण्या केल्यानंतर सौ. आशाताई शिंदे यांचा अहवालही कोरोना पॉझिटिव मिळाला होता, सध्या आशाताई शिंदे या मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. लोहा ,कंधार मतदार संघाच्या विविध विकास कामांसाठी शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाविषयी हिरारीने आमदार शामसुंदर शिंदे व त्यांच्या पत्नी सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी कोरोनाच्या गंभीर काळात टाळेबंदीत शेतकऱ्यांच्या कापसासाठी विविध कापूस केंद्राला प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या होत्या ,लोहा कंधार तालुक्यतील हजारो नागरिकांना अन्नधान्याची व्यवस्था केली होती, परराज्यात अडकलेल्या हजारो नागरिकांची जेवनाची व राहण्याची व्यवस्था केलेली होती, मुंबई येथे गेल्या दोन आठवड्यापासून कंधार उपजिल्हा रुग्णालयाच्या व पानशेवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामाच्या प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी व मतदार संघातील इतर प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आमदार शामसुंदर शिंदे मुंबई येथे तळ ठोकून असतानाच आमदार शामसुंदर शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे ,आमदार शामसुंदर शिंदे यांच्या सर्व कुटुंबातील सदस्य पत्नी सौ. आशाताई शिंदे, मुलगा विक्रांत शिंदे, रोहित शिंदे ,भाऊ रावसाहेब पाटील शिंदे या सर्व आमदार शिंदे यांच्या कुटुंबीयांनी कोरोनाच्या महा मारीत मतदारसंघातील गोरगरिबांच्या मदतीसाठी व मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेतले होते, सध्या आमदार शामसुंदर शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी आशाताई शिंदे या मुंबई येथील रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहेत.

चौकट

लोहा ,कंधार मतदार संघात परतीच्या पावसाने मोठी ढगफुटी होऊन शेकडो हेक्टरवरील शेतीचे नुकसान झालेले आहे ,रस्ते खरडून गेली आहेत, अनेक घरांची पडझड झाली असल्याचे मला कळाले, ज्या दिवशी परतीच्या पावसाने लोहा तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले त्याच दिवशी शुक्रवारी माझा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाला असून मी जरी उपचारासाठी मुंबई येथे असलो तरी माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर कदापी सोडणार नसून ,तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीचे व घराच्या पडद्याचे तत्काळ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन , उपजिल्हाधिकारी ,तहसीलदार यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा करून सूचना दिल्या असून महसूल विभागाच्या पथकाने या भागाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे काम चालू असून नागरिकांनी माझी काळजी करू नका ,घाबरू नका ,लोहा, कंधार मतदार संघातील लाखो मायबाप जनतेचे माझ्यावर सदैव प्रेम असून लाखो जनतेनी मला आजपर्यंत भरभरून आशीर्वादच दिले आहेत, मी आणि माझी पत्नी लवकरच कोरोना वर विजय मिळवून लोहा ,कंधार मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच येईल असा विश्वास आमदार शामसुंदर शिंदे यांनी दूरध्वनीवरून बोलताना व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *