कंधार ; दिगांबर वाघमारे
राज्यातील महाआघाडी सरकारने केंद्राच्या कृषी हिताच्या कायद्याला स्थगिती देणे संदर्भातला काढलेल्या अध्यादेशाची होळी दिनांक 7 तहसील कार्यालय कंधार येथे भारतीय जनता पार्टी कंधार च्या वतीने होळी करून निषेधाचे निवेदन तहसीलदार कंधार यांना देण्यात आले .
केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या हिता चा कायदा संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून महामहिम राष्ट्रपती यांच्या स्वाक्षरीने पारित केला त्या मुळे देशभरातील सर्व शेकऱ्यांचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन हा कायदा अमलात आणला परंतु राज्यातील महा विकास आघाडी सरकार द्वेषा पोटी ह्या विधेकास स्थगिती आदेश कडून राज्यातील लाखो शेकऱ्यांना वंचित ठेवण्याचे काम करीत असल्याने याचा विरोध व निषेध करण्या साठी भारतीय जनता पार्टी कंधार च्या वतीने तहसीलदार कंधार यांना निवेदन देऊन स्थगिती आदेशाची होळी करण्यात आली यावेळी भाजपा किसान मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे,भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड,शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार ,माजी प स सदस्य किशन डफडे,शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष राजहंस शाहपुरे, मधुकर डांगे,संभाजी घुगे,चेतन केंद्रे,राजू लाडेकर,श्रीराम जाधव,अड सागर डोंगरजकर,बालाजी तोरणे,व्यंकटी लाडेकार,नवनाथ ऐतवाड,ज्ञानोबा मुंडे,बालाजी तोटवाड, शेख मेराज मगदूम, आदी उपस्थित होते