आरोपीला केली फाशीची मागणी…
योगी व मोदी सरकार व उत्तर प्रदेश पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
लोहा ; विनोद महाबळे
लोहयात सर्वपक्षीय दलित-बहुजन आंबेडकरी संघटनेच्यावतीने कॅन्डल मार्च काढून हाथरस येथील पीडित मनीषाला वाहिली श्रद्धांजली.
उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील वाल्मीकी समाजाची युवती मनीषा हिच्यावर ४ जातीवादी नराधमाने अत्याचार करून तिचा निर्दयपणे हत्या केली या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत असून दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता लोहा शहरात सर्व पक्षीय दलित-बहुजन आंबेडकरी संघटनेच्यावतीने प्रीत मनीषाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात कॅन्डल मार्च काढण्यात आले . पेणत्या पेटवून प्रीत मनिष्या तिला श्रद्धांजली वाहण्यात आली.
तसेच यावेळी उत्तर प्रदेश मधील योगी सरकार व केंद्रातील मोदी सरकार व उत्तरप्रदेश पोलीसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .
सदरील कॅन्डल मार्च ची सुरुवात लोहयातील डॉ.आंबेडकर नगर येथील क्रांतीसुर्य बुद्धविहारातून करून लोहा शहरातील मुख्य रस्त्याने अतिशय शिस्तबद्ध व शांततेच्या मार्गाने कुठलेही गालबोट न लागता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व पिढीतेला न्याय मिळण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने कॅन्डल मार्च काढण्यात आला व याची सांगता तुला क्रांतीसुर्य बुद्धविहारात करण्यात आली. यावेळी या कॅन्डल मार्च मध्ये लहानथोर , तरुणवर्ग व ज्येष्ठांनी प्रचंड प्रमाणात सहभाग नोंदविला व क्रांतीसुर्य बुद्धविहारात पणत्या पेटवून व वाल्मिकी समाजातील पिडीत मनिषाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली .
यावेळी रिपाईचे मराठवाडा संघटक तथा नगरसेवक बबनराव निर्मले, भारतीय बौद्ध महासभेचे लोहा तालुका अध्यक्ष शिनगारपुतळे, वंचीत बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते गंगाधर महाबळे, नगरसेवक बालाजी खिल्लारे, माजी अध्यक्ष व्ही.के. कांबळे, एन.जी.बनसोडे, डॉ. ज्ञानोबा हनवते, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पर्यटन सचिव रत्नाकर महाबळे ,राष्ट्रीय ढोर समाजाचे प्रदेशाध्यक्ष नामदेव फुलपगार, माजी नगरसेवक उत्तम महाबळे , रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड, स्वाभिमानी भीमसेनेचे लोहा – कंधार विधानसभा प्रमुख विलास सावळे , मातंग समाजाची ज्ञानेश्वर भिसे ,बाबासाहेब भिसे , मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचे इमाम लदाफ ,मोबीन शेख ,फिरोज मनियार , पत्रकार डी.एन.कांबळे , संतोष तोंडारे, युवानेते यशपाल निर्मले ,जयपाल निर्मले, युवानेते केतन खिल्लारे, महिंद्र हानवते, संजय महाबळे ,राजू महाबळे , येवले, ढवळे ,एडके यांच्यासहित मोठ्या प्रमाणात भीमसैनिक उपस्थित होते.
तसेच यावेळी पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन दिले