लोहा / प्रतिनिधी
राज्यात व देशात गेल्या सात महिन्यांपासून कोरोना या संसर्गजन्य महामारी रोगाने थैमान घातले असून यामुळे अनेक उद्योग धंदे अडचणीत आले असून यात ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या मेहनतीने रात्र न दिवस मेहनत करून रेशिम उद्योग (तूती) करू लागला पंरतू यंदा २०२० मध्ये लाॅकडाऊन व कोरोना या महामारीच्या काळात व मोठ्या अडचणीत सापडला असून रेशीम उद्योग डबघाईस आला असून रेशीमचे भाव प्रचंड प्रमाणात घसरले असून ते निम्म्यावर आले असुन यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून शासनाने रेशिम उद्योग शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून विशेष अनुदान द्यावे अशी मागणी लोहा तालुक्यातील बोरगाव (आ.) येथील शेतकरी कल्याण पाटील बोरगावकर यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुढे निवेदनात असे नमूद केले की, शासनाच्या आवाहनानुसार आम्ही रेशीम उद्योग सुरू केला असून रेशीम उद्योगास चालना मिळाली म्हणून रोहयो अंतर्गत तूतीस अनुदान दिले रोहयो अंतर्गत मजूरांना रोजगार देत आहेत पंरतु आमच्या सारख्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतः रेशीम उत्पादन सुरू केले आहे.सुरूवातीस रेशीम उद्योग परवडत होता ५० हजार रुपये क्विंटल भाव होता रेशीम कोष ५०० रूपये किलो दराने विक्री होत होती परंतु आता कोरोनाच्या काळात २० ते २५ हजार रुपये क्विंटल भाव चालू आहे.२०० ते २५० रुपये किलो दराने रेशीम कोष कारखानदार, व्यापारी खरेदी करीत आहेत.
त्यामुळे रेशीम उद्योग शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे लाखो रुपये खर्च करून रेशीम उत्पादनासाठी शेड उभारले आहे तूतीची लागवड केली आहे बाहेरून अनेकांचे कर्ज घेतले आहे. ते कर्ज कसे फेडावे तेव्हा ज्या शेतकऱ्यांनी स्वतः रेशीम उद्योग सुरू केले आहे त्यांना ही शासनाने रोहयो अंतर्गत सामिल करून घ्यावे तसेच कोरोनाच्या काळात सहा ते सात महिन्यांपासून रेशीम उत्पादक शेतकरी फार मोठ्या अडचणीत सापडला आहे त्यांचे कंबरडेच मोडले आहे तेव्हा याकडे शासनाने तात्काळ लक्ष द्यावे व रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात आर्थिक मदत करावी अशी मागणी लोहा तालुक्यातील बोरगाव (आ.) येथील शेतकरी कल्याण पाटील बोरगावकर यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.