काव्य ;-
‘अण्णा’
अण्णा तुझ्या तेजाने
तारे प्रकाशित झाले
अण्णा तुझ्याच त्या नेत्राने
सारी दुनिया पाहिले
अण्णा…
तुझा दिड दिवस शाळेतला
ऐकून वाचून सर्व वेडावले
तुझ्याच त्या प्रेरणेने जग सारे
नव्हत्याचा होता झालेअण्णा..
तुझ्या विचाराने प्रबोधन झाले
समाज जीवन बदलू लागले
तुझ्या त्या कादंबरीतील फकिरा
फकिराचे फकिरा झालेअण्णा…
अण्णा तुम्ही केला अंधार दूर
जगास दाविले उजेडाची पहाट
पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून
कष्ठकऱ्यांच्या हातावर असल्याचीदाखवून दिली वाट !
– पांडुरंग कोकुलवार, नांदेड
मो. ९०९६११६४५१