बडुरच्या दलीत वस्तीतील सी.सी.रोडच्यानिकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना;
नागरीक संतापले कार्यवाहीची मागणी
बिलोली ; नागोराव कुडके
तालुक्यातील बडुर या गावी मोठ्या प्रतिक्षे नंतर दिन दुबळ्या दलीतांची मागणी लक्षात घेऊन दलीत वस्ती योजने अंतर्गत सी.सी.रस्ता मंजूर करण्यात आला व त्याचे काम सुरु करण्यात येऊन हे काम जवळपास पुर्णत्वास आले आहे.हे काम एका गावातीलच म्होरक्याला समोर करून ग्राम पंचायत करीत आहे.असे सांगण्यात आले आहे.हे काम दर्जदार व्हावे या साठी ज्यांची काम करून घेण्याची जबाबदारी आहे असे पंचायत समितीचे अभियंता मेडेवार हेच जाणीव पूर्वक लाच खाऊ प्रवर्तीमुळे लक्ष न देता ग्राम पंचायतीला पाठीशी घातल्यामुळे झालेले काम अत्यंत निकृष्ट करण्यात आले आहे. या बाबत या मुजोर अभियंता यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला असता या कामा बाबत बेजबाबदार पणे बोलून कामाचे अंदाज पत्रक देण्यास नकार देत जणू गुत्तेदारास पाठिंबा देत असल्याचे आढळून आले आहे.झालेल्या या निकृष्ट कामामुळे बडूरच्या दलीत वस्तीत संताप व्यक्त करण्यात येत असून तात्काळ या अभियंता यांच्यावर कार्यवाही करून कामाची निपक्षपणे काँलीटी कंट्रोल मार्फत तपासणी करण्यात यावी अन्यथा यासाठी आंदोलन करीत रस्त्यावर यावे लागेल अशी मागणी दलीता कडून होत आहे.