शिक्षकांच्या जी.पी.एफ.स्लीप ऑनलाइन वितरण करा –शिक्षक काँग्रेसची मागणी

लोहा /प्रतिनिधी


शिक्षकांच्या सन २०१९-२० च्या जीपीएफ स्लीप आॅनलाईन वितरण करा अशी मागणी शिक्षक काँग्रेस च्या वतीने शिक्षक काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष विठुभाऊ चव्हाण यांनी केली.


दि.15/10/2020 रोजी जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने यशवंतराव चव्हाण सांकृतिक सभाग्रह जि.प.नांदेड येथे शिक्षकांच्या विविध प्रश्नासंदर्भात मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब,मा. शिक्षणाधिकारी साहेब व शिक्षक संघटना यांची शिक्षकांच्या प्रलंबीत प्रश्नासाठी संयुक्त बैठक घेण्यात आली.

या वेळी शिक्षक काँग्रेसची शिक्षकांच्या विविध प्रलंबीत प्रश्नासंदर्भात मागणी व भुमिका शिक्षक काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष विठुभाऊ चव्हाण यांनी मांडली या वेळी ही मागणी केली.या वेळी शिक्षक काँग्रेसचे राज्यकोषाध्यक्ष प्रकाश मुंगल सर ,राज्यसहसचिव ऊत्तम क्षिरसागर, जिल्हा नेते बाबुराव कैलासे सर ,जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कल्यानकर उपस्थित होते.

भा खालील मागण्याचे निवेदन देण्यात आले

1)सन 2019—20च्या शिक्षक व डी.सी.पी.एस.यांच्या जी.पी.एफ.च्या पावत्या 30आॅक्टोबर 2020 पर्यंत आॅनलाईन करुन वितरीत करण्यात याव्यात.

2)निवड श्रेणी व चटोपाध्यय वेतन श्रेणी पात्र शिक्षकांना त्वरीत देण्यात यावी

3)केंद्रप्रमुख,पदोन्नत मुअ. व विषय शिक्षक यांच्या पदोन्नत्या लवकर कराव्यात

4)जिल्हा गुरुगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक जादा वेतन वाढ देण्यात यावी.

5) शाळेचे विद्युत बिल ग्रामपंचायत मार्फत भरण्यात यावे

6)वैद्यकीय प्रस्ताव मंजुरीचा अधिकार शिक्षण विभाग प्रमुखस (प्रा.शिक्षणाधिकारी) यांना देण्यात यावा

7) पेंन्शन धारक शिक्षकांच्या ग्रॅज्युटीची रक्कम त्वरीत आदा करावी

8) विषय शिक्षक पदी पदस्थापना दिलेल्या शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी देण्यात यावी

9)निम शिक्षकांना एक मार्च 2014 च्या शासन निर्णयानुसार वेतन श्रेणी देण्यात यावी

10) कोवीड 19 व बी.एल.ओ.च्या कामातुन शिक्षकांना त्वरीत मुक्त करण्यात यावे

11) सन 2005 मधील जाने.व फेब्रुवारी चे एल.आय.सी.जि.पी.एफ.च्या हप्ताच्या रकमा एन.डी.सी.सी.बँकेतुन मागवून घेवून शिक्षकाच्या एल.आय.सी.व जि.पी.एफ.च्या खात्यात जमा करण्यात यावी

12) विषय शिक्षकांची झालेली गैरसोय दुर करण्यात यावी

13) शिक्षण विभागात दाखल केलेल्या फाईलला वेळेचे बंधन घालावे

14)शिक्षकांना मुख्यालयी राहाण्राची आट शिथील करण्यात यावी.

15) या पुढे शिक्षकांच्या सर्व बदल्या आॅनलाईन करण्यात याव्यात

16)शिक्षकांना निलंबन करण्याचे अधिकार मा.गटशिक्षणाधिकारी यांना दिलेले आहेत ते अधिकार तात्काळ काढून पुर्ववत ठेवण्यात यावेत

18) शि.वि.अ.व केंद्र प्रमुख यांचे पदभार मुळ पदावरील शि.वि.अ. व केंद्र प्रमुख यांना देण्यात यावे अन्यथा सेवा जेष्ठ शिक्षकांना देण्यात यावे

18) सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्त्यासाठी व सहाव्या वेतन आयोग्याच्या बाकी राहीलेल्या शिक्षकांच्या हप्त्यासाठी आर्थिक तरतुद ऊपलब्ध करुण देण्यात यावी अशी मागणी शिक्षक काँग्रेस च्या वतीने शिक्षक काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष विठ्ठूभाऊ चव्हाण यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *