वाचन : एक उत्तम छंद

15 ऑक्टोबर माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांचा जन्म दिन आपण “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करत असतो. माणसाला कुठला ना कुठला तरी छंद हवाच ! कारण जीवनातील निराशा दूर करणारे महत्त्वाचे साधन म्हणजे आपला छंद असतो. छंदही नाना प्रकारे असतात. काही खर्चिक असतात, तर काही इतरांना त्रासदायकही असतात. तसेच ते मनोरंजकही असतात.

पण वाचन हा एक असा छंद आहे , की तो खर्चिक जरी असला, तरी महत्वपूर्ण, उपयुक्त, मनोरंजनात्मक आणि विकसनशील आहे. जसे लहान लहान मुलांना एकेक शब्द ओठावर नवीन आला तेव्हा त्याला जो आनंद होतो. त्या आनंदाला मर्यादा नसते. तोच आनंद एकेक शब्द वाचता येणाऱ्याला होतो. आणि त्यातूनच त्याची वाचण्याची सवय किंवा छंद जडत असतो.एकदा मानसाला वाचण्याची सवय जडली कि वर्तमानपत्रे, मासिक ,ग्रंथ, चरित्र यावर आधाशीपणे तो ताव मारून आपली वाचनाची भूक शमवून घेत असतो.

कारण ‘वाचन’ हा एक गुरु असतो, मार्गदर्शक मार्गदर्शक असतो, चांगला मित्र असतो ,तो आपली वैचारिक शक्ती वाढवतो, ज्ञानाचे भांडार वाढवतो, आपली विद्वत्ता वाढवतो, स्मरणशक्ती वाढवतो आणि आपल्यासाठी सारे जग आपल्या जवळ आणतो. अशी विलक्षण शक्ती त्या वाचनातून मिळत असते.
आणि ही सवय जर लहानपणापासूनच लागली तर मग याचे फायदे अमर्याद आहेत.

यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान ग्रंथप्रेमीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. बाबासाहेबांना त्यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांनी लहानपणापासूनच त्यांच्यावर चांगले संस्कार टाकले. त्यांना वाचनाची आवड लावली. कथा, काव्य, ग्रंथ, चरित्र, छोट्या छोट्या गोष्टी असे भरपूर साहित्य त्यांनी त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिले. बाबासाहेबांनी जी नवी पुस्तके सांगितले ती पुस्तके सुभेदार रामजी आंबेडकर कुठूनही उपलब्ध करून देत असतात. पैसे नसले तरीही उधार, उसने करुन
जशी जमेल तसे करुन स्थानिक ठिकाणी नाही मिळाले ते शहरातून जाऊन पुस्तके आणीत असत आणि मुलांचा पुस्तकांचा हट्ट पुरवित असत. यासोबतच केळुस्कर गुरुजी यांची त्यांना मदत झाली. त्यांनीही त्यांना पुस्तकांची मदत केली. आणि यातूनच बाबासाहेबांची आवड वाढायला सुरुवात झाली.भ.बुद्धाचे चरित्र केळुस्कर सरांनीच दिले होते. पुढे ते पुस्तक वाचून त्यातील महत्त्वाची टिप्पणी काढायला शिकले. यातून वाचनाची आवड वृद्धींगत होवून त्यांचा ग्रंथसंग्रह वाढू लागला.
ते ज्या ठिकाणी शिकायला होते नोकरीच्या ठिकाणी होते,बडोदा,मुंबई, ईंग्लड,
अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना त्यांनी वेगळ्या विषयांचे ग्रंथांचे वाचन केले आणि त्यांना आपले ग्रंथालय असावे असे वाटू लागले. त्यासाठी त्यांनी नवी आणि जुनी अशी दोन्ही महत्त्वपूर्ण पुस्तके विकत घेऊन संग्रह केला. आणि ते विद्यार्थी दशेपासूनच एक जिज्ञासू वाचक आणि ग्रंथ संग्रहक होत राहिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयात जाऊन अठरा अठरा तास अभ्यास करायचे. बडोद्याच्या सेंट्रल लायब्ररी जाऊन मानववंशशास्त्र,इतिहास समाजशास्त्र अर्थशास्त्राचा अभ्यास केला. विभिन्न ग्रंथाच्या वाचनाने मुळेच स्वतः भिमरावांनाही ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा मिळाली. हा त्यांना ग्रंथ वाचनाचा महत्त्वाचा लाभ आहे.

विविध विषयांचे सखोल अभ्यास करून त्यांनी महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले. मुंबई व दिल्ली येथे संग्रहालय निर्माण केले. त्यांच्या ग्रथालयात अंदाजे सुमारे पन्नास हजार ग्रंथ होते. ग्रंथातून मिळवलेल्या फायदा ज्ञानाचा म्हणजे ते थोर कायदे निष्णांत झाले.. महान घटनापंडित झाले. भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार झाले. ज्ञानसंपन्न समाज नेता झाले. उत्कृष्ट संसद सदस्य झाले. कार्यक्षम मंत्री झाले. उत्तम व प्रभावशाली वक्ता झाले. महान राष्ट्रभक्त झाले.. दूरदूर्शी भविष्य दृष्टा झाले. आणि वेगवेगळ्या विषयावरच्या महत्त्वांच्या पुस्तकांचे व ग्रंथांचे थोर लेखक झाले. असा ज्ञानार्थी थोर नेता असणे म्हणजे देशाचे महाभाग्य होय. असा विद्वान ग्रंथप्रेमी व वाचन प्रेम म्हणजेच अभिमानास्पद भूषण आहे. आणि वाचकांसाठी फार मोठी प्रेरणा आहे.

या वाचनाच्या अवीट गोडीमुळेच ते बी. ए., एम. ए, पी.एचडी., एम.एस्सी, डी. एस्सी , बार- अँट -लाँ या सर्व पदव्या प्राप्त करून जागतिक इतिहासात (symbol of knowledge) विद्वत्तेचा मान त्यांनी पटकावला.
ग्रंथासाठी घर बांधणारा अद्वितीय ग्रंथप्रेमी म्हणून त्यांचे नाव इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिले गेले.

वाचन ही माणसात परिवर्तन घडवून आणणारी एक अद्भुत किमयाच म्हणावी लागेल.!!!

बाबुराव पाईकराव
सहशिक्षक
बापुराव देशमुख मा.व उ.मा.विद्यालय डोंगरकडा.
9665711514

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *