(वृत्त – हरीभगीनी)
उघड मनाचे दार तुझ्या या उगाच ह्रुदयी कुडू नको,
कष्ट करोनी सुख मिळवावे
फुका जीवनी रडू नको
सन्मार्गाची कास धरावी उगाच बाता मारु नको,
सदाचार हा अंगी असावा जुगार सट्टा दारु नको
धडक मार दे पटक संकटा विचार चित्ती करु नको,
घे आनंदी क्षण हे वेचुन
जुने अमंगळ स्मरू नको
नको लोभ लालसा धरू तू
अविचाराने वागु नको,
नको राग अन कपट मनाशी मार्ग असत्त्या लागु नको
व्रत हे आहे समाजसेवा हाव सत्तेचि धरू नको,
आदर कर तू लोकमताचा स्वतःच तुंबडि भरू नको
ज्ञानदान ही ईश्वरपूजा गोरगरीबा नडू नको,
सत्य सचोटी मार्ग धरावा कुसंगतीने बिघडु नको
रिकामटेकी समाज कंटक वेळ फुकट तू वैरु नको,
क्षणभंगुर हे जीवन आहे उगाच भटकत फिरू नको
■■■
© विजो
विजय जोशी
डोंबिवली (मालवण – सिंधुदुर्ग)
९८९२७५२२४२
१७/१०/२०२०