रेमडेसिवीरचा काळाबाजार

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. रेमडेसिवीर या औषधाची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे गरिब रूग्णांचे अतोनात हाल होत असून, त्यांचे मृत्यू होत आहेत. यात तातडीने हस्तक्षेप करीत गरीब रुग्णांना खासगी आणि सरकारी रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली होती.
महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. रेमडेसिवीर या औषधाची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे गरिब रूग्णांचे अतोनात हाल होत असून, त्यांचे मृत्यू होत आहेत. यात तातडीने हस्तक्षेप करीत गरीब रुग्णांना खासगी आणि सरकारी रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे की राज्यात दर दिवशी सरासरी सुमारे २० हजार कोरोना रुग्णांची भर पडत आहे. सरासरी  ४५० ने दररोज बळीसंख्या वाढते आहे. अशात रेमडेसिवीर हे उपचारातील एक महत्वाचे औषध असल्याने त्याचा पुरवठा सुरळीत राहील, हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. परंतु, अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची उपलब्धता नसल्याने गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्य सरकार उपलब्धतेचे कितीही दावे करीत असले तरी रूग्णालयांकडून मात्र टंचाईचेच कारण रूग्णांना सांगितले जात आहे. त्यामुळे रूग्णालयांकडून रूग्णांना थेट केमिस्टकडे ते खरेदी करण्यासाठी जाण्यास सांगितले जात आहे. याची किंमत लक्षात घेता, ते सामान्यांच्या आवाक्यात नाही. परिणामी त्यांचे मृत्यू होण्याचेही प्रमाण वाढले आहे.
रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी राज्य सरकारने मध्यंतरी प्रक्रिया राबविली. परंतू ती प्रक्रिया सदोष असल्याने अनेक जिल्ह्यातून खरेदी केलेला औषध साठा परत करावा लागला, असे वृत्त माध्यमांमध्ये आले आहे. रेमडेसिवीर अभावी रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. खरेदी योग्य झाली नसल्याने याच्या उपलब्धतेचा गुंता आणखी वाढला. परिणामी प्रचंड तुटवडा निर्माण झाला. यामुळे रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असून, त्यामुळे गरिबांचे सर्वाधिक हाल होत आहेत. अनेकांनी तर याचा गोरखधंदा सुरू केला आहे. एकिकडे गरिब रूग्णांचे मृत्यू आणि दुसरीकडे रेमडेसिवीरची काळाबाजारी ही स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे नवीन खरेदी प्रक्रिया राबवून जिल्हा प्रशासनांना हा साठा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच सर्व गरीब रुग्णांना सरकारी तसेच खाजगी रुग्णालयात सुद्धा रेमडेसिवीर मोफत उपलब्ध करून देण्यात यावे. या बाबत तातडीने आपण निर्देश प्रशासनाला द्यावेत आणि गरिब रूग्णांचे प्राण वाचवावे, असेही या पत्रात  म्हटले आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून, सिव्हिल हॉस्पिटलच्या कोविड इमारतीतील कंत्राटी ब्रदर (परिचारक) दीपक सातपुते याला अटक करण्यात आली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधूनच या इंजेक्शनची चोरी केल्याची कबुली त्याने दिल्याने तेथील रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता बळावली आहे. सातपुतेचा साथीदार फरार असून, न्यायालयाने सातपुतेला १७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.

 सिव्हिल हॉस्पिटलमधील कोविड इमारतीत दाखल होणाऱ्या करोनाबाधित रुग्णांच्या हक्काचे इंजेक्शन्स चोरट्या मार्गाने बाहेर विक्रीसाठी आणले जात असल्याची माहिती ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्राला मिळाली होती. ‘मटा’ने स्टिंग ऑपरेशन करून संशयित कर्मचाऱ्याकडून हे इंजेक्शन खरेदी केले. चार हजार ८०० रुपये किमतीचे हे इंजेक्शन सातपुतेने चार हजार ५०० रुपयांत विक्री केले. मायलन कंपनीच्या या इंजेक्शन्सचा स्टॉक सिव्हिल हॉस्पिटलकरिता मागविण्यात आल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाने दिली होती. त्यामुळे संबंधित परिचारकाने सिव्हिल हॉस्पिटलमधील हे इंजेक्शन विक्रीसाठी काळ्याबाजारात आणल्याचा दावा या स्टिंग ऑपरेशनद्वारे करण्यात आला होता. त्यानंतर कोविड संकटकाळात गरीब व गरजू रुग्ण औषधोपचारांपासून वंचित राहू नये, याची काळजी जिल्हा प्रशासन घेत असताना औषधांच्या काळ्याबाजारासारखे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला होता. त्यांच्या निर्देशानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’कडून या प्रकरणाचा घटनाक्रम व पुराव्यांचा तपशील समजून घेतला.

 सिव्हिल हॉस्पिटलचे मुख्य औषधनिर्माण अधिकारी जितेंद्र गोकुळ सोनवणे (वय ५१, रा. उंटवाडी) यांनी सोमवारी रात्री फिर्याद दिली. त्यानुसार दीपक गणेश सातपुते आणि कार्तिक किशोर सोनार (दोघेही रा. दाड बुद्रुक, ता. राहता, जि. अहमदनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील रेमडेसिवीर इंजेक्शनचा अपहार करून व त्याची परस्पर विक्री करून सिव्हिल हॉस्पिटलची फसवणूक केली आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चा भंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

सातपुतेला अटक केल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विशेषत: कोविड इमारतीत उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. त्याने अनेक इंजेक्शन्स काळ्याबाजारात विक्रीसाठी आणल्याची शक्यता आहे. हे इंजेक्शन्स त्याने कोणाला विक्री केले, सिव्हिल हॉस्पिटलमधील कोणत्या रुग्णांच्या हक्काचे हे इंजेक्शन्स होते, या इंजेक्शन्सची किती रुपयांना विक्री झाली, या गैरकृत्यात आणखी कोण सहभागी होते, याबाबतची माहिती सातपुतेकडून मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याची पोलिस कोठडी मिळणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद पोलिसांसह सरकारी वकीलांनी केला. त्यानुसार त्याला १७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 सातपुते याचा साथीदार कार्तिक सोनार हा देखील आरोग्य विभागात कामाला आहे. तो आणि सातपुते एकाच गावचे रहिवासी असले, तरी सध्या जय भवानीरोड परिसरात राहतात. सोनार देवळाली येथील कोविड केअर सेंटरमध्ये कामाला असल्याची माहिती सरकारवाडा पोलिसांनी दिली. ४ हजार ५०० रुपयांना या इंजेक्शनची विक्री केल्यानंतर हे पैसे मी आणि कार्तिक असे दोघांनी वाटून घेतल्याची माहिती सातपुते याने दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.”सातपुतेला अटक केली असून, सिव्हिल हॉस्पिटलची फसवणूक, काळाबाजार करण्यासाठी औषधाचा अपहार करणे यासह आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा साथीदार फरार झाला असून, त्याचा शोध घेत आहोत. न्यायालयाने सातपुतेला पोलिस कोठडी सुनावली आहे, असे हेमंत सोमवंशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी सांगितले. 

अत्यवस्थ कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर या ऍण्टी व्हायरल औषधाची मागणी आणि पुरवठा यांच्यात प्रचंड तफावत निर्माण झाल्याने औषधाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाच हजार 400 रुपये अधिकृत किंमत असलेल्या या औषधासाठी राज्यातील महानगरात तब्बल 30 ते 40 हजार रुपयांने विक्री होत असून, अकोल्यातही त्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग त्यावर लक्ष ठेवून आहे. 

ऑक्‍सिजन किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोना रुग्णांवर रेमडेसिवीर या औषधाची मात्रा लागू पडत असल्याची निरीक्षणे अनेक ठिकाणी नोंदविली गेल्यानंतर त्याचा उपचारासाठी वापर सुरू झाला आहे. 1 जून रोजी औषध आयात करण्यास आणि विक्रीस केंद्र सरकारने परवानगी दिली. पहिल्या टप्प्यात भारतात या औषधाचे उत्पादन करून ते निर्यात करणाऱ्या काही कंपन्यांकडून औषधाचा पुरवठा केला जात होता. सध्या 100 एमजीची एक कुपी (व्हाईल) अनुक्रमे चार हजार, साडेचार हजार आणि साडेपाच हजार रुपयांना उपलब्ध होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांच्या हाती सर्रास त्या औषधाची चिठ्ठी डॉक्‍टरांकडून दिली जात आहे. परंतु, बाजारात औषधच उपलब्ध नसल्याने या नातेवाइकांची प्रचंड धावपळ होत आहे. त्याचाच गैरफायदा घेत काळाबाजार सुरू झाला आहे. त्यामुळे औषध प्रशासनाकडून औषध विक्रेत्यांची माहिती घेवून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

रेमडेसिवीरचा काळाबाजार होऊ नये यासाठी हे औषध थेट रुग्णालयांनाच देण्याचा निर्णय झाला असून, सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयाकडे हे औषध पोहचले असल्याची खात्रीलायक माहिती आहे. 

अकोल्यातील एका शासकीय औषधी विक्रेत्याने 96 व्हाईलची खरेदी केली होती. त्याने ती ठाणे येथील शासकीय रुग्णालयाला विक्री केली असल्याची माहिती आहे. तर शहरातील एका मोठ्या हॉस्पीटलनेही सहा व्हाईलची मागणी रुग्णांच्या नावावर केली असून, ती रुग्णाला देण्यात आली असल्याची माहिती आहे. 
ही औषध मागविणाऱ्या औषध विक्रेत्यांची माहिती गोळा करण्यात येत आहे. या औषधाचा कोणीही काळा बाजार करू नये, यावर विभागाचे लक्ष आहे. चढ्या भावात विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. अकोला येथील औषधी विभागाचे सहायक आयुक्त हेमंत मेटकर यांनी ही माहिती दिली.

रेमडेसिविर इंजेक्शन हे औषध कोविड रूग्णांसाठी वापरण्यास शासनाची अनुमती आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार गरजूंना हे औषध सहज उपलब्ध व्हावे, यासाठी काटेकोरपणे दक्षता बाळगण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाचे सह-आयुक्त जे.बी.मंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सध्या महाराष्ट्रात या औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध असून तुटवडा होणार नाही, याबाबत योग्य ते नियंत्रण ठेवले जात असल्याचेही श्री.मंत्री यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. या औषधाच्या विक्री, वितरण व साठ्यावर आणि काळ्या बाजारावर अन्न व औषध प्रशासन विभाग नियंत्रण ठेवत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन या औषधाच्या प्राप्त, वापर व शिल्लक साठ्याबाबतची माहिती प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध असून त्यावर प्रशासनातर्फे नियंत्रण ठेवले जात आहे. सदर औषधाचे वितरण फक्त रूग्णालय व संस्था यांनाच करण्यासाठी अनुमती दिलेली आहे.

आजतागायत प्रशासनामार्फत यापूर्वी काही प्रकरणी जप्ती व छाप्यांची कारवाई केली असून संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. आरोपींना पोलिसांमार्फत अटक करण्यात आलेली आहे.

प्रशासनामार्फत अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयात २४X७ नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. त्याचा क्रमांक ०२२-२६५९२३६४ आहे तसेच टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ हा उपलब्ध आहे. तरी रेमडेसिविर इंजेक्शन कोणत्याही रुग्णास मिळत नसल्यास अथवा औषधाचा काळाबाजार होत असल्यास त्या बाबतची माहिती त्यांनी संबंधित अन्न व औषध प्रशासन जिल्हा कार्यालयास अथवा नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधल्यास औषध मिळूवन देण्यास निश्चित मदत केली जाईल तसेच काळाबाजार होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही सह आयुक्त श्री. मंत्री यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांसाठी रेमडेसिवीरच्या १०० मिलीग्रॅम इंजेक्शनच्या एका कुपीची किंमत २ सहस्र ३६० रुपये निश्‍चित केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात नेमून दिलेल्या औषधांच्या दुकानांमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना अन्न आणि औषध प्रशासनाला दिल्या आहेत. या औषधाचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा पद्धती निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत.
मध्यम आणि तीव्र लक्षणे असलेल्या कोरोनाच्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन सरकारी रुग्णालयांमध्ये विनामूल्य मिळत आहे; मात्र खासगी रुग्णालये आणि औषधांची दुकाने याठिकाणी त्यासाठी मोठ्या प्रमाणात दर आकारले जात आहेत. या इंजेक्शनची मागणी अधिक असल्याने याचा काळाबाजार केला जातो. त्यामुळे हे इंजेक्शन मिळण्यासाठी धावपळ करावी लागत असून मिळेल त्या किमतीला विकत घ्यावे लागत आहे. हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने कार्यपद्धत निश्‍चित केली आहे.
१. जिल्हा किंवा शहर यांच्या ठिकाणी २४ घंटे वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध असतात. तेथे हे प्रस्ताव घेण्याची सुविधा संबंधित यंत्रणांनी करावी. या ठिकाणी २४ घंटे औषधविक्रेत्याची नियुक्ती करावी. कागदपत्रांची पडताळणी करून प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून एका घंट्याच्या आत नेमून दिलेल्या खासगी औषधी केंद्रास कुप्यांची संख्या आणि दर लिहिलेले पत्र द्यावे. तेथून औषधांचा पुरवठा केला जाईल, अशी पुरवठा पद्धती निर्माण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
२. रुग्णांसाठी रेमडेसिवीरची आवश्यकता असल्यास खासगी रुग्णालयांनी शहरातील आरोग्य अधिकारी किंवा वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक असणार आहे. यामध्ये इंजेक्शनची चिठ्ठी, रुग्णाचा कोरोनाचा अहवाल, आधारकार्ड किंवा इतर छायाचित्रे असलेले प्रमाणपत्र आणि रुग्णाची वैद्यकीय माहिती द्यावी लागणार आहे.

 राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी शुक्रवारी भायखळ्यातील एका मेडिकल दुकानावर धाड टाकली. कोरोना उपचारात प्रभावी औषध ठरणाऱ्या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे शिंगणे यांनी भायखळ्यात मेडिकलमध्ये जाऊन औषधांची पाहणी केली.

यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, “रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबजार होत असल्याच्या तक्रारी गेल्या दोन दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशासनाकडे येत होत्या. रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार मेडिकल दुकानदारांनी रुग्णाचं आधारकार्ड, डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन आणि फोन नंबर या सर्व गोष्टींची नोंद करुन औषध देणं जरुरीचं आहे. या नियमावलीनुसार मेडिकलचे मालक औषधांची विक्री करतात का, ते तपासलं जातंय”
शिंगणे पुढे म्हणाले, “आज सकाळपासून मुंबईतील विविध मेडिकलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा किती आहे तसंच त्यांनी किती रुपयांना इंजेक्शन खरेदी केलंय याबाबत माहिती घेतली जातेय. मेडिकल्समध्ये सध्या रेमेडिसीवर इंजेक्शनचा स्टॉक कमी आहे. मात्र औषध पुरवणाऱ्या कंपन्यांनी दोन दिवसात पूर्ण औषध पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे. औषध छापील किंमतीतच विकलं गेलं पाहिजे त्याचा काळाबाजारा व्हायला नको. याबाबत मी आणि गृहविभाग मिळून योग्य ती कारवाई करणार.”

 रेमडेसिवीर इंजेक्शन तुटवडा असल्याने हे औषध ज्यादा दराने विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारीअन्न आणि औषध प्रशासनाकडे आल्या आहेत. रेमडेसीवीर औषधांचा काळाबाजार फक्त मुंबईतच नाही तर देशभरात होत असल्याचं समोर आलंय.

रुग्णांना आधीच कोरोनाचे भय असल्यामुळे भयापोटी हे रुग्ण मृत्यूमुखी पडत आहेत. योग्य इलाज नसणे हेही त्याचे कारण आहे. खाजगी दवाखान्यात भरमसाठ फी आकारली जाते. सर्वसामान्यांना हे परवडत नाही. हा खर्च लाखांवर आहे. शुद्ध हवेचा पुरवठा न होणे, फुफ्फुसे, किडनीवर आघात होणे, श्वासोच्छवासास भयंकर त्रास होणे आदी त्रासांवर‌‌ इलाज म्हणून महागड्या औषधींचा मारा केला जातो. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करून‌ या संकटातही बख्खळ वरकमाई करणारे महाभाग आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी फायद्याची बाजू पाहू नये. खेडेगावातही या लाचार परिस्थितीचा फायदा उचलल्या जात आहे. आता तर सरकारी दवाखान्यात दाखल झालेला अत्यावस्थ झालेला रुग्ण बरा होऊन घरी परतेल याची श्वाश्वती नसल्याची एक भिती गावोगावी पसरत आहे. अशा बिकट परिस्थितीत गोरगरिबांचे हाल काय होत असतील तेच जाणोत!

गंगाधर ढवळे ,नांदेड 


संपादकीय /१८.१०.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *