कंधार ;
कंधार तालुक्यात कोरोणा बरोबरच नैसर्गिक आपत्तीचे संकट कोसळले असून या आपत्तीत अंगावर वीज कोसळून ३ व्यक्तीचा मृत्यू झाला आणि एक जखमी झाला आहे. व ३६ पाळीव प्राण्यांचा मृत्यू झालाचे समोर आले आहे .
दिनांक 13 जून 2020 रोजी हरबळ येथील अर्चना हनुमंत गिरी वय 26 वर्षे (शेतमजूर ),दिनांक 20 जुलै 2020 रोजी गऊळ येथील शेतकरी उद्धव पांडुरंग तेलंग वय 52 वर्षे , दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी औराळ येथील बालाजी दशरथ गवाले वय 51 वर्षे ( शेतमजूर )तर दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी शिराढोण येथील शेतकरी शंकर लक्ष्मण संगेवार वय 65 वर्षे हे गंभीर जखमी झाले असून नांदेड येथील आधार हॉस्पिटल येथे उपचार घेत असल्याची माहिती महसूल सहाय्यक उत्तम जोशी यांनी दिली.
गत आठ महिन्यापासून कोरोनाविषाणू या संसर्गजन्य आजारांशी दोन हात करण्यासाठी स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्यासाठी शासन नियमांचे तंतोतंत पालन करत असल्याचे दिसून येते.
ग्रामीण भागातील शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांची, सुशिक्षित बेरोजगार मुले कामाच्या शोधात पुणे, मुंबई, हैदराबाद, औरंगाबाद अशा मेट्रो सिटीत कामाच्या शोधात जाऊन हाताला काम मिळविले होते
मिळणाऱ्या रोजंदारीच्या पैशातून गावातील कुटुंबाला आर्थिक मदत करत असल्याचे दिसून येत होते .परंतु कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजाराच्या भीतीपोटी त्यांनी शहरातील कामधंदा सोडून थेट गावाकडची वाट धरली व पूर्वीप्रमाणेच गावात मिळेल ते काम करू लागली.
विशेषता प्राधान्याने शेतीचे कामे करू लागली .शेतीचे काम करत असताना सुद्धा या नैसर्गिक संकटाने विजेच्या माध्यमातून घाला घातल्याचे दिसून येते.
यावर्षी कोरोना बरोबरच शेत मजूरासह शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्तीचे संकट कोसळले.
कंधार तालुक्यात जुन 2020 ते अॉक्टोबर 2020 या चार महिन्यात तीन व्यक्तीचा वीज पडून जागीच मृत्यू झाला तर चौथा व्यक्ती अंगावर वीज पडल्याने गंभीर जखमी झाला आहे .
यात सर्वाधिक 36 पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.तर त्यात गाय 6 , म्हैस 8, बैल 22 आहेत ,तर यात हरबळ व औराळ येथील दोन शेतमजुराचा समावेश आहे.
कोरोना पाठोपाठ परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकरी व शेतमजूर आणि शेतीवर काम करत असताना जिव गमावावा लागला आहे. तेव्हा नागरीकांनी विजांचा कडकडात होत असेल तर स्वरक्षणासाठी झाडाखाली न थांबता शेतातील आखाड्यावर ,खोपीत थांबण्याचे प्रशासनाच्यावतीने तहसिलदार विजय चव्हाण यांनी आवाहन केले आहे.
नैसर्गिक अपत्तीमुळे दुर्दैवी मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबाला तात्काळ मदत देण्यात येणार असल्याची माहीतीही तहसिलदार विजय चव्हाण यांनी दिली.