फुलवळ : धोंडीबा बोरगावे
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी फुलवळ ता . कंधार येथे नवरात्र महोत्सवानिमित्त रोकडेश्वर दुर्गा मंडळाच्या वतीने दुर्गा मातेच्या मूर्तीची घटस्थापनेच्या दिवशी प्रतिष्ठापना करण्यात आली.
परंतु कोरोना विषाणुच्या प्रार्दुभाव व या माहामारीतील संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा शासनाच्या नियमांचे पालन करत हा नऊ दिवसाचा उत्सव एकदम साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
फुलवळ येथे गेली २१ वर्षापासून चालत आलेला नवरात्र महोत्सव दरवर्षी मोठ्या भक्ती भावाने तसेच नऊ दिवसाला नऊ विविध कार्यक्रम आनंदाने आयोजित करण्यात येतात मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहुन मोठ्या प्रमाणात होण्याची गर्दी लक्षात घेता हा उत्सव साजरा करायचा कि नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
ग्रामीण भागात कोरोनाबाधीत रूग्ण संख्या आणि त्यापासून होणारा संसर्ग पाहता सर्वांच्या हितासाठी व आरोग्यासाठी या वर्षी १७ आक्टोबर ते २५ आक्टोबर असे नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात भाविकांची गर्दी , जमावबंदी वा अन्य कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम न घेता दररोज सकाळी आणि रात्री फक्त देवीची आरती होईल व प्रसाद वाटप होईल या व्यतिरिक्त कोणतेही कार्यक्रम न घेण्याचा निर्णय कमिटीने घेतला.
यावेळी दुर्गा महोत्सव कमिटीचे अध्यक्ष सचिन मंगनाळे, उपाध्यक्ष संतोष स्वामी, सचिव योगेश मंगनाळे, कोषाध्यक्ष गजानन डांगे सदस्य ओमकार स्वामी, पत्रकार परमेश्वर डांगे, शिवहार स्वामी, गजानन सोमासे,नामदेव सोमासे, रमाकांत फुलवळे, विकास डांगे मंडळाचे व्यवस्थापक रामराव डांगे, सुर्यकांत फुलवळे, संतोष डांगे ,तुकाराम फुलवळे, बाबु जाधव आदी उपस्थित होते.