कंधार ,म्हणजेच प्राचीन राष्ट्रकुट काळातील कन्हार, पांचाळपूर ,कंधारपुर या ठिकाणी या परिसरामध्ये राष्ट्रकूट काळातील ,अनेक कला परंपरेतील बऱ्याच धर्मियांचे शिल्पे जैन,बौध्द व हिंदू त्याच बरोबर बुद्धमूर्ती व सम्राट अशोक यांची मूर्ती हत्तीपुरा (भीमनगर फुलेनगर कंधार)येथे सापडलेल्या आहेत मराठवाड्यातील अनेक इतिहासकारांच्या
(डॉ. इतिहास तज्ञ प्रभाकर देव, प्रो.डॉ.अनिल कठारे,डॉ.व्हि.के. भालेराव) सखोल विवेचनातून असे स्पष्ट होते की, इसवी सन पूर्व 600(सहाशे) ते 800(आठशे) या चौदाशे वर्षाच्या काळात. जंबुद्वीपतील 16(सोळा) राज्यांसह “अस्मक” व त्याची राजधानी “पोतन “म्हणजे सध्याचे गोदावरी कडे नदीकडील दक्षिणेकडील भाग, आणि आंध्रातील ‘बोधन’ सर्व परिसर बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार होऊन धम्माय झालेला होता.
हे लक्षात येते.” कंधार हे राष्ट्रकुट काळातील बौद्ध धर्मीयांचे धम्मपीठ” होते हे लक्षात येते, इतिहासकारांचे लक्ष वेधून घेणारी धम्म चक्र प्रवर्तन मुद्रा ही मांडी घातलेली आणि दोन्ही हात हृदयावर जोडलेली तथा मांडीवर ठेवलेली आणि यामध्ये बोटांची ठेवण विशेष लक्ष देण्यासारखे असते, अशीच वैशिष्ट्यपूर्ण बुद्धमूर्ती असलेली कंधार येथे इसवी सन 1958 बहादरपुरा परिसरामध्ये सापडली असून, ती सध्या कंधार येथील बौद्धद्वार विहारात प्रतिष्ठापित केलेली आहे.
या बुद्ध मूर्तीची उंची 90 सेंटिमीटर जाडी 60 सेंटिमीटर आहे, ही बुद्ध मूर्ती इसवी सनाच्या आठव्या शतकातील असून राष्ट्रकूट कालीन सम्राट कृष्ण पहिला यांच्या काळातील आहे. या बुद्ध मूर्तीच्या डोक्याच्या पाठीमागे प्रभा मंडळ आहे. डोक्याचे केस कुरूळे दाखवले असून, त्यावर केसांची गाठ आहे .या बुद्धमूर्ती च्या बाजूला दोन चोरी धारक सेवक आहेत .
तसेच या बुद्ध मूर्तीच्या दोन्ही बाजूला एक_एक अश्व प्रतिमा व गजमुख दाखवलेले आहेत. ही बुद्ध मूर्ती “कुशान”कला परंपरेतील आहे. ही बुद्ध मूर्ती पद्मासन अवस्थेत असून तिचा चेहरा धीरगंभीर आहे या बुद्ध मूर्तीच्या असन पीठावर एक शिलालेख आहे .
तो असा
“हे धर्म हेतू पभावा, हेतू तेषं तथागतो हवदत्त ।
तेषा च य निरोधः वादी महाषमणो”।।
दिही लिपी नागरी व भाषा संस्कृत आहे. यात बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानाचा सार आहे .प्रतित्यसमोत्पाताच्या सिद्धांतानुसार सारी विश्वा अनुभूती हेतू प्रभावळ आहे, आणि तथागताच्या उपदेशानुसार शांतीने संयमाने याही विश्वा अनुभूतीला निरोध करता येते.
म्हणजेच_ हेतूने कारणाने उत्पन्न होणाऱ्या जेवढ्या वस्तू आहेत, त्यांचा उत्पन्न होण्याचा हेतू स्पष्ट आहे. आणि हाच हेतू तथागत भगवान बुद्ध आपल्या धम्म उपदेश सांगतात. आणि त्यावर उपाय तथा निरोध ही सांगतात .हाच महाश्रवण तथागताचा धम्म मार्ग आहे.
इसवी सन 1836(अठराशे छत्तीस) ला “कनिंगहॅम “यांनी मध्यप्रदेशातील सारणात येथील चौखंडी व धम्मेख स्तूप उत्खनन करून प्रकाशात आणला ,व त्या धम्मेक स्तुपावरील मूळ पाली गाथेतील शिलालेख आहे .
तो असा
“हे धम्म हेतू पभ्भावा,हेतू तेसं तथागत।
तेसं निरोधः एव वादी महासमणानो ।।
म्हणजेच कंधार येथील,बौध्दव्दार विहारातील बुध्दमूर्तीच्या आसन पीठावरील शिलालेख आणि सारणात येतील धम्मेक स्तुपावरील शिलालेख हे सारखाच आहे .म्हणून “राष्ट्रकूट काळात प्रसिद्ध असे बौद्ध धम्मियांचे धम्मपीठ होते,
हे लक्षात येते.
बौध्दाचार्य निलेश अशोक गायकवाड
(भा.बौ.म.कंधार)
9096872358