लोहा शहराच्या विकास निधीसाठी कोणाकडे जाण्याची गरज नाही….खा.चिखलीकर यांचा आ.शिंदे यांना टोला

लोहा / प्रतिनिधी


माझ्या आमदारकीच्या काळात लोहा कंधार मतदार संघात जेवढा निधी आला त्याच्या 25% जरी निधी विद्यमान आमदार यांनी आणला तरी खूप झाले .लोहा शहराच्या विकास कामाच्या निधीसाठी कोणाच्याही दारात जाण्याची गरज नाही प्रतापराव पाटील चिखलीकर सक्षम आहे असे नाव न घेता आमदार शामसुंदर शिंदे यांना प्रत्युत्तर देत खासदार चिखलीकर यांनी नगरपालिका क्षेत्रात कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना येत्या काळात होईल असे आश्वासन दिले.


लोहा शहरातील पाच कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळू सावकार पालीमकर होते तर व्यासपीठावर नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी ,पंचायत समिती सभापती आनंदा पाटील शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी पाटील मारतळेकर, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य माणिकराव मुकदम ,उपसभापती नरेंद्र गायकवाड ,उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, कंधारचे उपनगराध्यक्ष जफरोदीन बाहोदीन, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक छत्रपती धुतमल, माजी उपनगराध्यक्ष रामराव सुर्यवंशी, भाजपा कंधार तालुकाध्यक्ष भगवान राठोड ,शहराध्यक्ष गंगाप्रसाद यनावार ,गटनेता करीम शेख, जिल्हा परिषद सदस्य सुभाष गायकवाड, दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य साहेबराव पाटील काळे, नगरसेवक भास्करराव पाटील पवार ,अमोल व्यवहारे , संदीप दमकोंडवार, दत्ता वाले ,माजी सभापती खुशाल पाटील, माजी सभापती उपसभापती लक्ष्मण बोडके, माजी उपसभापती बालाजी पाटील कदम, दिलीप जाधव ,अभंग पाटील गाडेकर, प्रभारी मुख्याधिकारी अशोक मोकले, पोलीस निरीक्षक भागवत जायभाये ,दासा पाटील , सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी विश्वंभर मंगनाळे, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.


आमदार शामसुंदर शिंदे यांनी जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर टीका केल्यानंतर आजच्या भाषणात प्रतापराव काय बोलतात याची उत्सुकता होती अर्ध्या तासाच्या भाषणात त्यांनी आमदार शिंदे यांचे एकदाही नाव घेतले नाही पण त्यांच्या कार्यपद्धतीवर खास शैलीत प्रहार केला.


नगरपालिकेचा निधी परत गेला परंतु नगराध्यक्षा यांनी आमदार मुळे परत गेला असे एकदाही सांगितले नसतानाही ज्या पद्धतीने विरोध झाला तो पाहता कारभार कसा सुरू आहे यावर बोट ठेवले लोहा नगर पालिकेचा विकास निधीसाठी कोणाच्याही दारी जायाची गरज नाही. प्रतापराव पाटील सक्षम आहेत असे सांगून आगामी पंचवीस वर्षाचे विकासाचा विचार करून नगराध्यक्षांनी
नियोजन करावे अंडरग्राऊंड डेॢनेज साठी शंभर कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल असे आश्वासन दिले मतदारसंघाला प्रतापरावांनी काय विकास केला की नाही हे ठाऊक आहे पण बोलत असेल तर बोलण्याचं काहीच होत नाही मागील पाच वर्षात जेवढा या भागासाठी निधी आणला त्याच्या 25 टक्के निधी विद्यमानाने आणावा बस झाले आम्ही जाहीर सत्कार करू असं नाव न घेता आमदार शिंदे यांना आवाहन दिले .


कार्यक्रमाचे प्रस्ताविक नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी केले प्रस्ताविकेत नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी म्हणाले की लोहा शहरातील जनतेने खा‌ प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कामावर विश्र्वास ठेऊन लोहा नगरपालीकेत नगराध्यक्षसह १४ नगरसेवक निवडून दिले. निवडणुकीत आम्ही जे जे आश्वासन दिले होते ते मी आमचे नेते खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करणार. आतापर्यंत शहरात 18 कोटी रुपयांची कामे झाल्याचे त्यांनी सांगितले सांगितले शहरातील विकास कामांसाठी मी आणि माझा नेता सक्षम आहोत भविष्यात शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन दिले.

यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य माणिकराव मुकदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे बालाजी पाटील मारतळेकर यांची भाषणे झाली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विक्रम कदम यांनी तर आभार नगरसेवक भास्करराव पाटील पवार यांनी मानले .
दरम्यान विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार प्रताप पाटील व मान्यवरांच्या हस्ते झाला नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी व त्यांच्या टिमच्या कामाचे खासदार प्रतापराव पाटील यांनी प्रशंसा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *