कंधार ; विठ्ठल चिवडे
सीमा सुरक्षा दलातील गणेश चव्हाण मेघालयात तुरा येथे कर्तव्यावर असताना त्यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला होता.त्यांच्या पार्थिवार कुरुळा येथे दि.२० रोजी जिल्हा कल्याण अधिकारी व पोलीस प्रशासन यांच्या वतीने मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी शाश्रूनयनानी कुरुळवासीयांनी अमर रहे च्या गजरात गणेश चव्हाण यांना अखेरचा निरोप दिला. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांनी जवान गणेश चव्हाण यांच्या कुटूंबाची भेट घेवून सात्वंन केले.
मूळ गाव पोमा तांडा परंतु गणेश यांच्या जन्मापासून कुरुळा गावात चव्हाण कुटुंबीय वास्तव्यास होते.गणेश हे एकूण सहा भावंडांपैकी पिराजी चव्हाण यांचे चौथे अपत्य होते.अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत बारावीपर्यंतचे शिक्षण कुरुळा गावात पूर्ण केले.१९९८ ला गणेश यांची सीमा सुरक्षा दलात निवड झाली होती.मृत्यूसमयी ते मेघालयात बांग्लादेश सीमेनजीक ढोबासीपाडा,तुरा येथे कर्तव्यावर होते.त्यांचा बक्कल क्र.००००३६६१६ सी टी/जी डी सी ७५ बटालियन अंतर्गत कार्यरत होते.मृत्यूसमयी त्यांचे वय ४२ वर्ष असून हयातीत आजतागायत त्यांनी २२ वर्ष अखंड देशसेवा केली.रविवारी सकाळच्या सुमारास ८:४५ वा. त्यांच्या मृत्यू झाल्याचे सैन्य दलातील सब इन्स्पेक्टर महेंद्रसिंग यांनी बोलताना सांगितले.
मृत्यूचे कारण उत्तरीय तपासणी अहवालानंतर समजेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.त्यांचे पार्थिव मंगळवार ता.२० रोजी १० वा. कुरुळा येथील राहत्या घरी आणण्यात आले.यावेळी गणेश चव्हाण अमर रहे च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.गावासह परिसरावर दुःखाची छाया पसरली होती.अखंड देशसेवा करत असताना त्यांचा झालेल्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली होती.तदनंतर १२:३० वा.च्या दरम्यान प्रशासकीय कर्मचारी,पोलीस दल,सीमा सुरक्षा दलातील जवान यांच्या उपस्थितीत श्री शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणासमोरील जागेत गणेश यांचा मुलगा मनोज चव्हाण या चिमुकल्याने पार्थिव शरीरास मुखाग्नी दिला.
तत्पूर्वी जिल्हा कल्याण अधिकारी यांच्या वतीने हवेत फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. तदनंतर सीमा सुरक्षा दलातील जवनांनीही हवेत फैरी झाडून मानवंदना दिली.यावेळी कुरुळा ग्रामप्रशासन,पोलीस प्रशासन,महसूल प्रशासन यांच्या वतीने उचित बंदोबस्त करण्यात आला होता.विविध राजकीय,सामाजिक मान्यवरांनी मुखाग्निपूर्वी पुष्पचक्रानी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी कंधार- लोहा आमदार प्रतिनिधी आशाताई शिंदे,मुखेड-कंधार चे आमदार डॉ.तुषार राठोड,कंधार एस डी ओ. पांडुरंग बोरगावकर ,प्र.तहसीलदार विजय चव्हाण,उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे,पोलीस निरीक्षक विकास जाधव,पोलीस कॉन्स्टेबल सुनील पत्रे,कुरुळा जिल्हा परिषद सदस्या शोभाताई गोमारे,बाळासाहेब गोमारे,देविदास भाऊ राठोड,शिवाभाऊ नरंगले,प.स.सदस्या रेखाताई धुळगंडे,अंत्यसंस्कार झाल्यानंतर हिंगोलिचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी चव्हाण कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.अंत्यसंस्कार विधीसाठी कुरुळा गावचे सरपंच उमाकांत चिवडे,माजी सैनिक जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड, मंडळ अधिकारी गझलवार,तलाठी अन्सारी,दुधाटे,कुरुळा पोलीस चौकीचे बिट जमादार सुभाष चोपडे,बालाजी केंद्रे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची भूमिका बजावली.
****** video newd***