दौरा सत्ताधाऱ्यांचा ; बोलबाला फडणविसांचा !

महाराष्ट्र राज्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेले संपूर्ण पिक वाहून गेले आहे. शेतकऱ्यांनी वर्षभर घेतलेली मेहनत मुसळधार पडणा-या पावसात वाया गेल्यामुळे आता खायचे काय असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, शासकीय मदत करण्यासाठी  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पूरग्रस्त भागातील पाहणी करत आहेत. राज्यात अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूरात पोहचले आहेत. तर, महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर असून ते उस्मानाबादमधील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पाहणी दौरा सुरू झाला असून बारामतीमधून या दौऱ्याला सुरुवात झाली. 

 दौऱ्याला सुरुवात झाल्यानंतर नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे, तुम्ही एकटे नाही, कोणीही वाऱ्यावर पडलं नाही, आपलं सरकार हे तुमचं सरकार आहे, तुमच्या पाठिशी आहे, तुम्हाला धीर द्यायला आलो आहे, काळजी करू नका, नुकसान भरपाई देऊ पण कोणाचेही जीव जाऊ देऊ नका. सावध राहा, किती नुकसान झालंय याचे पंचनामे सुरु आहेत, माहिती गोळा केली जात आहे पण माहिती गोळा करून त्याचा अभ्यास करत बसणार नाही, हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, लवकरच मदत जाहीर करू असं त्यांनी  गावकऱ्यांना सांगितलं आहे. तसेच विरोधी पक्षाने राजकारण करू नये, राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही, आपत्ती काळात केंद्र आणि राज्य असं काही करू नये, केंद्राकडून राज्याला जे देणं आहे असेल ते केंद्र सरकारने द्यावे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

अतिवृष्टीचे संकट टळेपर्यंत नुकसानभरपाईसंदर्भात कोणताही निर्णय घाईने घेतला जाणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटीनंतर आणि पाहणी दौऱ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. सध्या आम्ही माहिती घेण्याचे काम करत आहोत. विविध भागांत नुकसानीचे पंचनामेही सुरु आहेत. या सगळ्याचा अंदाज घेतल्यानंतर प्रत्यक्ष मदत जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

राज्यावर अतिवृष्टीचं मोठं संकट आलं असून यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कधी आलं नाही असं सकंट राज्यावर आलं आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सर्वांनी मदत करण्यासाठी पुढं आलं पाहिजे असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. अतिवृष्टीमुळे गावपातळीवरील रस्ते खराब झाले त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे, अतिवृष्टीचा परिणाम ऊस पिकावरही झाला, आधी कधी आलं नाही असं संकट यंदा राज्यावर आलं. उस्मानाबाद, लातूर, नांदेड, पंढरपूर, इंदापूर, सोलापूर याठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचंही मोठं नुकसान झालं,हे नुकसान भरून काढण्यासाठी कर्जाशिवाय पर्याय नाही त्यामुळे लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून कर्ज काढण्यास आग्रह करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी दिली आहे.

तसेच महाराष्ट्रावर ऐतिहासिक आर्थिक संकट आहे. संपूर्ण संकटाचं ओझं एकट्या राज्य सरकारला झेपेल का?, केंद्र सरकारला मदत करावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला ही बातमी वाचली, निवडणुकीत आम्ही एकमेकांविरोधात बोलतो, पण अशा संकटावेळी मदत करण्याची भूमिका घेतो, कारण हे राष्ट्रावरील संकट आहे. देशाच्या संकटांना तोंड देण्यासाठी सगळे एकत्र येतो, भाजपा सरकार असताना गुजरातमध्ये भूकंप झाला त्यासाठी माझ्यावर जबाबदारी दिली होती, निर्णय घेताना पक्ष बघितला जात नाही, संकटग्रस्त माणसांना त्यातून बाहेर कसं काढता येईल यासाठी सगळेच प्रयत्न करूया असंही शरद पवार म्हणाले.

५३ वर्षात विधानसभा, लोकसभा, राज्यसभा यात मी काम केलं त्यात एकही दिवस लोकांनी सुट्टी दिली नाही, संकटात मी बसू शकत नाही, माझ्या हातात प्रशासनाची जबाबदारी नाही, संकटात लोकांना भेटावं लागेल पण ज्यांच्या हातात सत्तेचा कारभार असतो त्यांना अनेक ठिकाणी लक्ष द्यावं लागतं, त्यामुळे मुंबईत एकाठिकाणी राहून सगळ्या जिल्ह्यांशी संपर्क साधून निर्णय घ्या अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली होती, आम्ही सगळे नेते, इतर मंत्री फिल्डवर फिरत आहोत, त्याचा आढावा आम्ही त्यांना देत असतो. एका जागेवर बसून प्रशासनाचे नियोजन करून निर्णय घ्यावे लागतात असं सांगत शरद पवारांनी मुख्यमंत्री मुंबईबाहेर पडत नाही यावर प्रश्नावर उद्धव ठाकरेंची पाठराखण केली.  खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या मतदारसंघात जाऊन तेथील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली आहे. 

अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिकाचं नुकसान झालं आहे, जनावरांना चाराही उरला नाही, पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर कोणी आलं नाही, १०० टक्के शेतीचं नुकसान झालं आहे. त्यामुळे पंचनामे वैगेरे या भानगडीत न पडता तात्काळ मदत केली पाहिजे, जनावारांना चारा दिला पाहिजे, त्यासाठी राज्य सरकारने पाऊलं उचलावी, अतिवृष्टी झाल्यानंतर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे, परंतु राज्य सरकारने प्राथमिक जबाबदारी ओळखून तात्काळ मदत केली पाहिजे, मागील वर्षी पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर मी १० हजार कोटी तातडीने मदत जाहीर केली, केंद्र सरकारचं पथक येईल, नुकसान भरपाईचा आढावा घेईल, राज्य सरकारने जबाबदारी झटकून चालणार नाही, केंद्र सरकार मदत करणार आहे, पण तोपर्यंत राज्य सरकारने मदत करायला हवी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केली आहे.

 अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार राज्याला सहाय्य करेलच. पण राज्य सरकारनं टोलवाटोलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत द्यावी. सोयीस्कर भूमिका घेऊ नये. सगळंच केंद्रावर ढकलायचं असेल, तर मग राज्य सरकार कशासाठी आहे, त्यांचं काम काय, असे प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले. अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी फडणवीस यांनी पावसाच्या पाण्यातून आणि चिखलातून मार्ग काढला. 

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी फडणवीस यांनी बारामतीमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी, काही शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंतही पावसाच्या पाण्यामुळे जाता येत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. तसेच, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील रस्ता पूर्णपणे खचला असून घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे, त्याला तातडीने मदत करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. यावेळी, पाण्यातून आणि चिखलातून वाट काढत फडणवीस यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. 
‘सोयीस्कर राजकीय भूमिका कोणीच घेऊ नये. मदत कशी मिळते हे सगळ्याच नेत्यांना माहिती आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टोलवाटोलवी नको. पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार मदत करेलच. पण पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे राज्यानं तातडीनं मदत करावी. राज्य सरकारनं केंद्राच्या मदतीची वाट बघत राहू नये. ते स्वत: काय करणार ते त्यांनी सांगावं,’ असंही फडणवीस म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याची टीका भाजप नेत्यांकडून वारंवार केली जात आहे. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा बचाव केला. बाकीचे नेते, मंत्री प्रत्यक्ष फिल्डवर जातील. परिस्थितीचा आढावा घेतील आणि त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली जाईल, अशी कार्यपद्धती आम्ही ठरवली असल्याचं पवार यांनी आज सांगितलं. त्यावर सरकार अपयशी ठरत असल्यानं पवारांना बचाव करावा लागतो, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं.राज्य शासनाचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी सरकारचा बचाव करण्याचं एकमेव काम ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उरलं आहे, असा टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

बारामती तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडवणीस यांचा पाहणी दौरा सोमवारी(दि १९) १०.१५ वाजता सुरु झाला. सुरवातीला फडवणीस यांनी जिरायती भागातील उंडवडी. क.प. येथे भेट देत पाहणी केली. सकाळी १० वाजता येथील विमानतळावर खासगी विमानाने फडवणीस यांचे आगमन झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना फडवणीस यांनी हा टोला लगावला. तुळजापूर येथे ज्येष्ठ नेते पवार यांनी मुख्यमंत्री घरातून का काम करतात,असा पत्रकारांशी प्रश्न केला .त्यावर एकाच ठिकाणी थांबुन काम करण्यासाठी आम्हीच त्यांना विनंती केल्याचे पवार यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर फडवणीस यांनी पत्रक़ारांशी बोलताना ज्येष्ठ नेते पवार यांना हा टोला लगावला.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने काय मदत करणार आहे ते सांगा. उगीच टोलवाटोलवी नको आहे. कोणत्याही संकटप्रसंगी सगळे केंद्र सरकारवर ढकलून तुम्हाला नामानिराळं होता येणार नाही. तुमची काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केला. 

बारामती तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची सोमवारी फडणवीस यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शरद पवार कृषीमंत्री होते. त्यांना केंद्राकडून मदत कशी मिळते हे माहिती आहे. केंद्राचे पथक येते, राज्याचा अहवाल केंद्राकडे गेल्यानंतर  गृहमंत्री, अर्थमंत्री व कृषीमंत्री एकत्र बसतात. त्यानंतर मदतीची भूमिका निश्चित करतात. केंद्र सरकार निश्चित मदत करेल, परंतु सोयीस्कर राजकीय भूमिका कोणत्याच नेत्यांनी  घेऊ नये. लोकांना काय मदत करणार हे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारच्या गंभीर दौऱ्यांदरम्यान थिल्लर वक्तव्ये करणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, अशी टीकाही  फडवणीस यांनी केली.

फडणवीस म्हणाले, मी काळजीवाहू मुख्यमंत्री असताना  पावसाने झालेल्या नुकसानीनंतर दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्याच्या वतीने मदत सुरु केली. अतिवृष्टीनंतर पाच दिवसात  पंचनामे पूर्ण केले. जेथे पंचनामे होऊ शकले नाहीत, तेथे मोबाईलवर फोटो काढून टाकला तरी तो पंचनामा म्हणून ग्राह्य धरला होता. आता तर शंभर टक्के नुकसान झालेले असताना पंचनाम्यात वेळ घालविण्यापेक्षा तत्काळ व्यवस्था व्हायला हवी, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या जुना व्हिडीओ भर पत्रकार परिषदेत दाखवला. या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी कोरडवाहु शेतीसाठी हेक्टरी २५ हजार रुपये आणि बागायतीसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी केली होती. त्यांचा हा व्हिडीओ दाखवून आता तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहात, तुम्ही जी वारंवार मागणी करत होता, आता ती पूर्ण करण्याची वेळ आहे, असा सणसणीत टोला फडणवीस यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यात अवकाळी पाऊस झाला होता. त्यावेळी सरकारनं १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली होती. ‘सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली १० हजार कोटी रुपयांची मदत अतिशय तुटपुंजी आहे. या मदतीमुळे काहीही होणार नाही. सरकारनं निकषाच्या फुटपट्ट्या बाजूला ठेवून हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत तातडीनं जाहीर करावी. शेतकऱ्यांचं हेक्टरमागील नुकसान २५ ते ५० हजार रुपये इतकं आहे,’ असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. फडणवीस यांनी उद्धव यांचा तोच व्हिडीओ दाखवत मुख्यमंत्र्यांकडे आता शेतकऱ्यांना मदत करण्याची संधी आहे. त्यांनी तातडीनं शेतकऱ्यांना मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. 

अजित पवारांनीही अशाप्रकारे १० हजार कोटींची मदत तोकडी आहे, ही मदत कोणाला पुरणार आहे? असं सांगितलं होतं. ही घोषणा पूर्ण करण्याची संधी आता आहे. सरकारनं जाहीर केलेली १० हजार कोटींची रक्कम अतिशय कमी आहे. फळभाज्या, फळबागा आणि इतर पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. दीड ते दोन लाख कोटी रुपयांची भरपाई गरजेची आहे. पाहणी-आढावा घेतल्यानंतर मिळणारी मदत येईल तेव्हा येईल. पण आता सरकारनं तातडीनं मदत करावी,’ असं अजित पवार त्यावेळी म्हणाले होते. 
प्रत्येक जबाबदारी केंद्रावर टाकायची आणि आपण मात्र नामानिराळे व्हायचे, आपले जणू काही कामच नाही, ही  प्रवृत्ती  योग्य नाही. पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे, ती पार पाडत तातडीची मदत शेतकऱ्यांना द्यायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन करून मदतीची ग्वाही दिली आहे, असेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 राज्यातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच राजकारण तापले आहे. विरोधी पक्षाकडून सातत्याने राज्य सरकारवर टीका केली जात आहे. तसेच, पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सत्ताधारी नेत्यांसोबतच विरोधी पक्षातील नेतेही शेतकऱ्यांच्या बांधावर उतरले आहेत. सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली. यावरून युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 

सत्यजित तांबे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर देवेंद्र फडणवीस यांचा गेल्यावर्षी आलेल्या पूराची हॅलिकॉप्टरमधून पाहणी करतानाचा फोटो आणि आताचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट घेतल्याचा फोटो, असे तीन फोटो ट्विट केले आहेत. तसेच,  या फोटोला सत्यजित तांबे यांनी फरक जमिनीचा व हवेचा, अशी कॅप्शन दिली आहे. तर, आणखी एका ट्विटमध्ये माणूस सत्तेवर असताना जमिनीवर पाहिजे, सत्ता गेल्यावर तर सगळेच जमिनीवर येतात, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर निघाले असताना थेट बांधावरूनच या दोघांत वाकयुद्ध रंगले. मुख्यमंत्र्यांनी शेलक्या शब्दांत फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिल्यानंतर पुन्हा एकदा फडणवीसांनी पलटवार केला आहे. 

बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा आपल्या राज्यात लक्ष घाला. तुम्ही राज्याचे विरोधी पक्षनेते आणि एक जबाबदार नेते आहात. तेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार पूरग्रस्त जनतेसाठी काय करेल, याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्यासाठी आधी काम करा. तुम्ही सध्या नियमितपणे बिहारला जात आहात. तसे थोडे दिल्लीतही जा. तुम्ही दिल्लीत गेलात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील घराबाहेर पडतील, असा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
केंद्र सरकार हे देशाचे सरकार आहे, परदेशाचे नाही. राज्याची आणि देशाची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. केंद्र सरकारने पक्षपात करू नये. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी बिहारमध्ये प्रचाराला जाण्यापेक्षा राज्यातील संकटासाठी एकत्र येऊन केंद्राकडे जाऊन मदत मागावी. मी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बसलो नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमवारी पाहणी दौरा केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. पुढील २-३ दिवसांत माहिती गोळा करण्याचे काम होईल. त्यानंतर सरकारकडून जे शक्य आहे ते आम्ही करणार आहोत.  मुख्यमंत्री मुंबईबाहेर पडत नाहीत अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. याकडे लक्ष वेधले असता, घोषणा देणारे गेले, आम्ही प्रत्यक्षात काम करू, असा टोला ठाकरेंनी विरोधकांना लगावला.  

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी मंत्री दादाजी भुसे  यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश  वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  अक्कलकोट तालुक्याचा दौरा करुन पाहणी केली. रामपूर या गावी ग्रामस्थांशी संवाद साधला.  नुकसान भरपाईची काळजी करु नका, स्वत:चा जीव सांभाळा, अशी ग्रामस्थांना त्यांनी विनंती केली. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

आज पाणी आहे. त्यांनी काय बोलावे, मागावे यापेक्षा त्यांचे दु:ख ओळखून आम्ही त्यांना मदत करणार आहोत. माझ्यावर टीका करणाऱ्यांनी बिहारला जाण्याऐवजी दिल्लीत जावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. सांगवी खुर्दच्या ग्रामस्थांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संवाद साधला, यावेळी तुम्ही एकटे नाही, सरकार तुमच्या पाठिशी आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ग्रामस्थांना दिलासा दिला आहे

मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे, तुम्ही एकटे नाही, कोणीही वाऱ्यावर पडलं नाही, आपलं सरकार हे तुमचं सरकार आहे, तुमच्या पाठिशी आहे, तुम्हाला धीर द्यायला आलो आहे, काळजी करू नका, नुकसान भरपाई देऊ पण कोणाचेही जीव जाऊ देऊ नका. सावध राहा, किती नुकसान झालंय याचे पंचनामे सुरु आहे, माहिती गोळा केली जात आहे पण माहिती गोळा करून त्याचा अभ्यास करत बसणार नाही, हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, लवकरच मदत जाहीर करू असं त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं आहे.

विरोधी पक्षाने राजकारण करू नये, राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही, आपत्ती काळात केंद्र आणि राज्य असं काही करू नये, केंद्राकडून राज्याला जे देणं आहे असेल ते केंद्र सरकारने द्यावे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्याआधीच वाद निर्माण झाला होता, सांगवी खुर्दच्या ग्रामस्थांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बोरी नदीच्या पुलावर या असे सांगितले गेले, पण, पुलावरुन नुकसान भरपाईची पाहणी करणार कसं? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित करत मुख्यमंत्री गावात आले तर ठीक, नाहीतर आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती.

सुरक्षेचे कारण देत प्रशासनाने गावकऱ्यांची समजूत काढली त्यानंतर काही गावकऱ्यांना रस्त्यावर बोलवण्यात आले, या लोकांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संवाद साधला.

परतीचा पाऊस आणि पुरामुळे राज्यातील काही भागांत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौऱ्यावर आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या पाहणी दौऱ्यावर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आशिष शेलार यांनी देर आए, दुरुस्त आए, असा टोला मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला लगावला आहे. तसेच मुख्यमंत्री बॉलिवूडमधून बाहेर पडून बांधावर गेल्याने शेतकऱ्यांना काहीतरी न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

राज्यात गेल्यावर्षीही नोव्हेंबर महिन्यात काही भागांत अतिवृष्टी झाली होती, तेव्हाही पवारसाहेबांनी विरोधी पक्ष म्हणून पाहणी दौरा केला होता. तेव्हा त्यांनी हेक्टरी २५ ते ३० हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी केली होती. मात्र, काही दिवसांत ते सत्तेत आले, सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांना या घोषणांचा विसर पडला. विदर्भात महापूर आला, कोकणात चक्रीवादळ आलं पण तिथंही या सरकारकडून मदत मिळाली नाही. आताही महाराष्ट्र पाण्याखाली गेलाय, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय आणि तुम्ही दौरे करताय. पवारसाहेबांना बांधावर जावं लागतंय, मग सरकार काय करतंय, असा प्रश्न भाजपा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी विचारलाय. 
प्रत्येक वेळेस केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जातं, मदत करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली. पण राज्य सरकारने काय केले हे सांगावे, अतिवृष्टी झाली केंद्र मदत करेल, पण किती नुकसान झालंय याचा आढावा तरी राज्याने केंद्राकडे पाठवला पाहिजे. तहसिलदार पोहचत नाही, प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत नाही, राज्य सरकारने नुकसानीचा आढावा तरी घ्यायला हवा, केंद्र सरकारने प्रत्येक वेळेस मदत केली, कोरोना काळातही मदत केली. परंतु राज्य सरकारने एक योजना दाखवावी असं आव्हानही गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारला दिलंय.

मुख्यमंत्र्यांचा दौरा जाहीर झाल्यानंतर ६ महिन्यानंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही ब्रेकिंग न्यूज होते, असं असेल तर महाराष्ट्रसाठी दुर्दैव दुसरं काय नाही, शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही अपेक्षा धरली नाही, निर्णय घेण्याची क्षमता नाही, कोणतीही अंमलबजावणी नाही, प्रत्येक अडचणीच्या काळात विरोधी पक्षनेते गावागावात पोहचले आहेत, कोरोना, चक्रीवादळ, विदर्भ पूर प्रत्येक ठिकाणी देवेंद्र फडणवीस लोकांच्या मदतीसाठी पोहचले आहेत असंही गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

काय-काय म्हणाले आहेत माजी मुख्यमंत्री?

फडणवीस म्हणाले, राज्याचा नाकर्तेपणा समोर येत आहे. आमचा दौरा घोषित झाल्यावर सगळे पालक मंत्री जनतेच्या भेटीला गेले.शेतकरी एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये आहे. सरकारने प्रथम शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. तुमचे राज्यपालांसोबत जे काही मतभेद असतील ते चालत राहतील.  राज्यपालांबरोबर यापूवीर्ही मतभेद झालेत. त्यामुळे आता तो विषय नाही.  शेतकऱ्याला काय मदत मिळणार ? केंद्राची वाट न बघता राज्यानं मदत करावी. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या परिस्थितीत राज्य सरकार काय करणार आहे हे स्पष्ट सांगावे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टोलवाटोलवी नको आहे. केंद्र मदत करेलच. पण त्याआधी तुम्ही काय करणार ते सांगा. 
राज्यात शरद पवार यांच्या सारखा जानकार नेता कुणीच नाही. पण, पवार हे सरकारला कसे वाचवता येईल एवढेच बोलत आहे. शरद पवार हे सरकारचा नाकर्तेपणा झाकून ठेवत आहे. तुम्ही जर राजकीय बोलला, तर मला राजकीय बोलावे लागणार आहे’  मला राजकारणात रस नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर मोठी जबाबदारी आहे. राजकीय भाष्य टाळून संवदेनशीलता दाखवून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, अशी विनंती आम्ही सरकारकडे करतो.

राज्यात काही संकट आले की, नेहमी केंद्राकडेच बोट दाखवण्याचा प्रकार सुरू आहे. पण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच फोन करून मुख्यमंत्र्यांकडून माहिती जाणून घेऊन मदतीचे आश्वासन दिले केंद्र सरकारची मदत कधी येते हे पवार यांना माहिती आहे. केंद्राच्या समितीचे प्रमुख हे गृहमंत्री, अर्थमंत्री असतात. केंद्राकडून एनडीआरएफसाठी निधी दिला असतो, त्याचा वापर करता येतो. त्यामुळे राज्य सरकारने कारणे न दाखवता तातडीने मदत केली पाहिजे. 
शरद पवारांनी आवश्यकता असेल तर कर्ज काढलं पाहिजे असा चांगला सल्ला दिला आहे. कर्ज काढणे हे काही पाप नाही. आपले जे बजेट आहे. त्यातील ७० ते ८० टक्के रक्कम कर्जातून येते. आपल्याला एक लाख वीस हजार कोटींचं कर्ज काढता येते. आतापर्यंत साठ हजार कर्ज घेण्यात आले आहे. त्यामुळे कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करता येईल, असंही फडणवीस यांनी सांगितले. 

‘शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मी केंद्र सरकारला आधी विनंती केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोललो आहे. राज्य सरकारकडून मदत आल्यावर योग्य ती मदत पाठवण्यात यावी. मी अमित शहा यांच्याशी बोललो काय, किंवा उद्धव ठाकरे बोलले तरी मदत ही तेवढीच मिळणार आहे. राज्यातला दौरा पूर्ण केल्यानंतर अमित शहा यांच्याकडे पूर्ण माहिती देणार आहे. 

 सत्तेत असणाऱ्या तिन्ही पक्षात मतभेद असले तरी केंद्राकडे हात दाखवण्यात एकमत आहे. जबाबदारीतून हात झटकले जातायेत, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची गरज आहे. तुम्ही राजकीय भाष्य कराल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. मला राजकारण करण्याची गरज नाही, शेतकऱ्यांनाही राजकारण नको आहे. 
 कोरोनामुळे आर्थिक संकट जसं राज्यावर आहे तसं केंद्रावरही आहे. कर्ज काढलं पाहिजे ही शरद पवारांची सूचना योग्य आहे, या सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी शरद पवारांवर जबाबदारी आहे. शरद पवारांना सगळ्या गोष्टींची माहिती आहे. परंतु सरकारचा बचाव करण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढचं ते बोलतात. शेतकऱ्यांकडे प्रशासनाचे कोणतेही अधिकारी पोहचले नाहीत अशा तक्रारी अनेक शेतकऱ्यांच्या आहेत. इच्छाशक्ती असेल तर राज्य सरकार मदत करू शकतं परंतु केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारी झटकली जाते असं त्यांनी सांगितलं.  

तसेच जीएसटीबाबत मार्चपर्यंत सर्व अनुदान केंद्राने राज्य सरकारला दिला आहे, राज्याप्रमाणे केंद्रालाही जीएसटी मिळाला नाही, केंद्र सरकार १ लाख कोटींची कर्ज घेऊन राज्याला जीएसटी नुकसान परतावा देणार आहे. तो पैसा राज्याला येणार आहे. परंतु आता राज्य सरकारनं त्वरीत शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. राज्याची कर्ज काढण्याची पत १ लाख २० हजार कोटी आहे, सध्या ५० हजार कोटींचे कर्ज राज्यावर आहे, त्यामुळे आणखी कर्ज काढू शकतो असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 आपत्ती परिस्थितीत अतिरिक्त व्यवस्था उभी करायला हवी, कृषी, महसूल खात्यातील अधिकाऱ्यांची यंत्रणा जे फिल्डवर काम करतात त्यांना जबाबदारी दिली पाहिजे. वेगवेगळ्या विभागांना एकत्र केलं तर लवकर शेतकऱ्यांना मदत दिली जाऊ शकते. मी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर कधीही टीका केली नाही, पुलावरून पाहणी केली त्यावर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. दौरा करा अथवा करू नका, पण शेतकऱ्यांना मदत करा असं सांगत राज्याला तात्काळ मदत द्यावी असं विनंती मी अमित शहांना केली आहे. मी बोललो अथवा मुख्यमंत्री बोलले तरी केंद्र सरकार राज्याला भरघोस मदत करणार आहे. मी संकटकाळात पक्षपातीपणा करत नाही 

आज पत्र पाठवाल, उद्या महिलांना लोकल सेवा सुरु करता येत नाही, त्यासाठी नियोजन करावं लागतं, कुठून कुठपर्यंत रेल्वे चालवायची, वेळेचे नियोजन, गर्दीचे नियोजन कसं करायचं हे सगळं राज्य सरकारने माहिती दिली तर निश्चित लोकल सेवा सुरु होईल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील परिस्थितीत अतिशय थिल्लरपणा करत आहेत. तसेच इतक्या दिवसांतून आज दोन-तीन तासांसाठी बाहेर आला आहात तर लगेचच स्वतःची तुलना मोदी साहेबांशी करू नका. 

महाराष्ट्र राज्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतामध्ये वर्षभर घेतलेल्या मेहनतीने तयार झालेले पीक मुसळधार पावसाच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून त्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा आहे. महाराष्ट्रामध्ये ओढावलेल्या या पूरजन्य परिस्थितीचा आढावा मी केंद्रातील काही मंत्र्यांबरोबर चर्चा करून त्यांच्याकडून भरीव मदत कशी मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करीन. पण त्याचबरोबर राज्य सरकारने आपल्या खांद्यावरील जबाबदारी झटकू नये. 

अतिवृष्टीमुळे शेतकरी प्रचंड मोठ्या संकटात आहे. त्याला मदतीची गरज आहे. त्यामुळे सरकारनं या प्रश्नात राजकारण करू नये. सत्तेत असलेल्यांनी संयम दाखवायचा असतो. पण तरीही काल मुख्यमंत्री उद्घव ठाकरे राजकीय बोलत होते. सत्तेत असलेल्या व्यक्तींनी संयमीपणे वागायचं असतं. संवेदनशीलपणे प्रश्न हाताळायचे असतात. इच्छाशक्ती असली की मार्ग काढता येतो, असं फडणवीस म्हणाले. ‘वेअर देअर इज अ विल, देअर इज अ वे, असं इंग्रजीत म्हणतात. पण या सरकारच्या बाबतीत वेअर देअर इज नो विल, देअर इज ओन्ली सर्व्हे, असं म्हणायला हवं.
 अंधारात लाईट लावून पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली. पावसाने कांदा, सोयाबीन व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे तसंच शेती वाहून गेल्याचं गाऱ्हाणं शेतकऱ्यांनी फडणवीसांच्या कानावर घातलं. तसंच मदत न मिळाल्यास आत्महत्या केल्यावाचून आमच्याकडे काही एक पर्याय नसल्याचं शेतकऱ्यांनी फडणवीसांना सांगितलं. त्यावर ‘तुमच्यावर अशी वेळ येऊ देणार नाही. आपण सरकारकडे जास्तीत जास्त मदत मागू’, असं फडणवीस म्हणाले.

फडणवीसांनी रोसा गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. “परतीच्या पावसाने आमचं होत्याचं नव्हतं झालंय. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेलाय. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीने आमचं कंबरडं मोडलंय. काल-परवा पडलेल्या पावसाने आमचं फार नुकसान झालंय. सरकारने आतातरी आम्हाला तात्काळ मदत करावी”, अशा व्यथा शेतकऱ्यांनी फडणवीसांसमोर मांडल्या.

“तुम्ही काही काळजी करु नका. सरकारकडून आपण जास्तीत जास्त मदत मिळवून घेऊ. काळ कठीण आहे. परंतु जिद्द सोडायची नाही. सरकारशी भांडून तुम्हाला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन”, असा धीर फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिला.

परतीच्या पावसाचा किती मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे, याचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्यासासंबंधी आश्वासने नेत्यांनी दिली. मात्र सध्या सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांचे दौरे सुरु असले तरी केंद्र व राज्य सरकार एकमेकांकडे बोट दाखवत मदतीचा चेंडू एकमेकांकडे टोलवत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी अजूनही राज्य सरकारने किंवा केंद्र शासनाने भरीव मदतीची घोषणा केलेली नाही.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दुपारपर्यंत हे दौंड-बारामती भागात होते. त्यानंतर भिगवण, इंदापूर, करमाळ्याचा त्यांनी दौरा केला. “सरकारने मदत द्यावी म्हणून सरकारवर दबाव निर्माण करु. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. विरोधात असताना आणि आमच्यासोबत असताना ते मागण्या करायचे. आता त्यांना ईश्वराने मदतीसाठी शक्ती दिली आहे. त्यांनी तातडीने मदत करावी. तातडीने मदत करण्यासाठी काहीही लागत नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 

चिखलातून पायवाट काढीत जाणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हायरल झालेल्या फोटोवर नेटीझन्स तुटून पडले आहेत. त्यांच्या काही समर्थनार्थ आणि विरोधातील काही प्रतिक्रिया बोलक्या आहेत.

 कोल्हापुर व सांगलीच्या पुराला तुमच्या मंत्र्यांनी नौकाविहार करुन , होडीत वेगवेगळ्या अँगलसनी फोटो सेशन केले होते, दिखाव्यासाठी .  तुम्हाला दोघीबाजुने दोघांनी हाताची साखळी करुन तुमच्या बुंध्याखाली धरुन पाण्यातुन उचलुन आणले होते , तेव्हाचा पहाणी दौरा जसा हायफाय पंचतारांकीत, उंटावरुन शेळ्या हाकण्यासारखा होता , जनता काही विसरली नाही , राज्यकर्त्यांचा जो गोड गैरसमज आहे की जनता विसराळु असते , पण ती अजीबात विसरत नाही , ती त्यांची पाळी आली का मग कानाखाली वाजवुन सांगते .     आता सत्ता गेल्यावर जमीनीवरुन करता आहेत, तेव्हाच जरा आतुन जिव्हाळाने केले असते, तर आज हे पायानी चिखल तुडवायची वेळ आली नसती .   पण साप निघुन गेल्यावर भुई थोपटुन , काय उपयोग ?

सत्तेत असते तर हवेत आले असते . सत्तेची हवा गेली म्हणून चिखलात फिरावे लागत आहे . बिहारमधून वेळ काढल्याबद्दल धन्यवाद . महाराष्ट्रासाठी केंद्राकडून तुमचा काहीतरी लाभ होऊ द्या . तेवढंच केंद्र सरकार मधील तुमचं वजन आम्हालाही माहीत होऊ द्या .

२०१९  च्या  निवडणुकीत —आमची (वडा पाव सैनिकाची )सत्ता  आल्यास बांधावर जाऊन सरसकट २५,०००/-  मदत देऊ – उध्दव ठाकरे १९/१०/२०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पाहणी दौरा! नुकसानभरपाई तर देऊच, मात्र सगळ्यांनी सावध राहा. मी दिलासा देण्यासाठी आलोय. दिलासा मात्र  काहीच नाही

तुम्ही तर कोल्हापूर सांगली च्या महापुराच्या वेळी माणस मुकी जनावरे शेतातल्या माती सकट वाहून गेली होती आणि तुम्ही छपराच्या भिंती च मोजमाप लावून आणि घरादारासकट वाहून गेलेल्या कागदपत्रांच्या पुराव्या वर मदत अडून ठेवली होती इतका मोजमाप लावणारा मुख्यमंत्री अजून पाहिला नव्हता आम्ही.

कोल्हापूर येथे आलेल्या महापुराच्या वेळी हवाई पाहणी करणारे आज कोट घालून चिखलात उतरुन पाहणी करण्याचे नाटक करत आहेत. जे चालताना सुद्धा भित भित चालत होते…ढोंग करतंय!

कोल्हापुरच्या पुराला घाबरून हेलिकॉप्टरमधुन ,तमाशा बघणारे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षात असताना रस्त्यावर आले,,,म्हणजे सत्ता जिरली की आपोआपच मतदारांची काळजी वाटते ,,,,,,,

बिहार मधील बांध असावा बहुतेक,महाराष्ट्राबददल त्यांना काही एक पडलेली नाही,महाराष्ट्रातील जनता मुर्ख नाही , एवढीच जर आपुलकी महाराष्ट्रातील जनते विषयी असेल तर केंद्राकडून जीएसटी ची रक्कम मिळण्याकरीता राज्य सरकारच्या बरोबरीन काम करावे

हेच जर का स्वतःहा मुख्यमंत्री असताना केले असते तर आज ही वेळ आली नसती. तुम्ही सध्याच्या मुख्यमंत्रीना शेतीच्या बांधावर यायला सांगता या अगोदर तुम्ही किती वेळा आलात….सध्याचे मुख्यमंत्री जमिनीवर उभा राहून तरी पाहणी करत आहेत तुम्ही तर हेलिकॉप्टर मधून करत होता.

फडनविसावर कितीही टीका केली पण ते तात्काळ निर्णय घेणारे कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणुन कायम आठवणीत राहतील .

शेतकऱ्यांना मदत करायची उध्दव ठाकरे सरकारची भूमिका आहे. आज त्याची सुरुवात त्यांनी आपल्या सोलापूर दौऱ्यात केलीय….. राज्याचे पैसे जे केंद्राने नाहक अडवून ठेवलेत, ते केंद्राला राजकारण न करता लवकर द्यायला सांगा…. म्हणजे सर्वांना महाराष्ट्र सरकार मदत करेल…. आणि तुम्हाला उगाच दगदग करावी लागणार नाही…..

आपण गेली पाच वर्षे काय करत होता?मागच्या वर्षी  कोल्हापूर ,सांगली महापुराचे वेळी तुम्ही व तुमच्या सरकारने काय दिवे लावले हे सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे.मागच्या वेळी अतिवृष्टी झाली तेव्हा आपण साडेतीन दिवसाचे मुख्यमंत्री होता तेव्हा केंद्राला तीस हजार कोटी परत केले होते आठवते का?

राज्यातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सत्ताधारी नेत्यांसोबतच विरोधी पक्षातील नेतेही शेतकऱ्यांच्या बांधावर उतरले आहेत. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांची भेट घेतली. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी (दि. २१) उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. 

बुधवारी उद्धव ठाकरे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देणार आहेत. तसेच, प्रत्यक्ष शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधणार आहेत.  राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आज पूरग्रस्त भागांची पाहणी केली. ते आजपासून ३ दिवसांचा दौरा करत आहेत. देवेंद्र फणडवीस आपल्या दौऱ्याची आजपासून बारामतीपासून केली. यानंतर उद्या २० ऑक्टोबरला उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसर्‍या दिवशी २१ ऑक्टोबरला रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत ९ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८५० किलोमीटरचा प्रवास ते करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापुरात, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लातुरात, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच दिग्गज नेत्यांनी पाहणी दौरे केले आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे. आम्हाला मदत कधी मिळेल? शेतकऱ्यांच्या शेतात अद्यापही पावसाचं पाणी दिसतंय, आज आणि उद्या हे पाणी ओसरेलही. पण, शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी कधी ओसरणार असा प्रश्न विचारला जात आहे.

 गंगाधर ढवळे,नांदेड 

संपादकीय

२०.१०.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *