सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केलेल्या पोलीस दलातील स्त्री शक्तीचा सन्मान
मुंबई ;
कोरोनाच्या लढ्यात आमच्या पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केले आहे. त्या स्त्री शक्तीचा सन्मान व गौरव करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
शक्ती, बुद्धी आणि नीतीचे प्रतीक
भक्ती-शक्ती व कृषी संस्कृतीचे प्रतीक असणारे नवरात्रीचे मंगल पर्व सुरु असताना महाराष्ट्र पोलीस दलातील स्त्रीशक्तीच्या कार्याचा यथोचित गौरव करणे मला गरजेचे वाटते, असेही गृहमंत्री श्री.देशमुख यांनी सांगितले.
स्वाती खाडे
महिलांचा सन्मान करणे, त्यांना बरोबरीची वागणूक देणे हा खरा स्त्री शक्तीचा जागर आहे. पुणे पोलीस (Pune City Police) दलातील संवेदनशील सहायक पोलीस निरीक्षक स्वाती खाडे यांनी पतीने ६ महिन्यांच्या बाळासह घराबाहेर काढलेल्या निराधार महिलेची परिस्थिती समजून घेत त्वरित ई-पास मंजूर केला. तसेच नातेवाईकांनी ठरविलेल्या कारमध्ये बसवून दिले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खाडे यांनी माणुसकीच्या नात्याने सदर महिलेला सर्वतोपरी मदत केली. खाडे यांच्या या प्रशंसनीय कार्याचा पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मला अभिमान आहे. असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
#anildeshmukh
#Swatikhade