लोहा / प्रतिनिधी
राज्यातील महा विकास आघाडी सरकारने लोहा नगरपालिकेच्या चांगल्या कामाला दिलेली स्थगिती उठवावी असे प्रतिपादन भाजपाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा येथे पत्रकार परिषदेत केले.
लोहा शहरातील नगरपालिका अंतर्गत पाच कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचा शुभारंभ खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते एका शानदार कार्यक्रमांमध्ये करण्यात आला . यानंतर लोहा नगर परिषदेच्या सभागृहामध्ये खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भरगच्च पत्रकार परिषद घेतली.
यावेळी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष शरद पवार, नगरसेवक भास्करराव पवार, अमोल व्यवहारे , करीम शेख ,दत्ता वाले संदीप दमकोंडवार अरूण येळगे नबी शेख, आदी उपस्थित होते .
यावेळी पुढे बोलताना भाजपा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर भरगच्च पत्रकार परिषदेत
पुढे बोलताना खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या कार्यकाळा मध्ये लोहा नगर परिषदेला मोठ्या प्रमाणात विकास निधी प्राप्त झाला होता. परंतु नंतर सत्तेत आलेल्या महा विकास आघाडी सरकारने लोहा नगर परिषदेचा काही पाच कोटी रुपयांच्या विविध विकास निधीस स्थगिती दिली. या निधीमधून लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक, मराठवाड्यात मॉडर्न ठरेल असे बुद्ध विहार, मुस्लिम समाज बांधवांसाठी शादीखाना , आदी चांगले विकास कामासाठी हा निधी आला होता त्यावर महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली ती स्थिती उठण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.
चांगल्या कामासाठी सरकारने स्थगिती देऊ नये.
राज्यात सगळीकडे अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार , मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडवणीस यांनी राज्यात दौरा काढून शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी करीत आहेत. तेव्हा सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.ना.
देवेंद्र फडवणीस ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी आ.अजितदादा पवार यांनी नामदार देवेंद्र फडणीस यांनी दहा हजार कोटी रुपयांची शेतकर्यांना मदत जाहीर केली होती ती फार अपुरी आहे असे अजितदादा पवार म्हणाले होते आता अजित दादा पवार हे उपमुख्यमंत्री आहेत आता त्यांना काम करण्याची संधी आहे त्यांच्याकडे तिजोरी च्या चाव्या आहेत . आता त्याने राज्यातील शेतकऱ्यांना ५० हजार कोटी रुपये निधी द्यावा व प्रत्येक शेतकऱ्याला ५० हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी ही खा. चिखलीकर यांनी केली आहे.