कंधार ; दिगांबर वाघमारे
परतीच्या पावसाने मुक्काम लांबविल्यामुळे व झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा विभागातील शेतकऱ्याच्या शेतातील उभ्या पिकाचे फार मोठे नुकसान झाले आहे.सोयाबीन च्या शेंगाना अंकुर फुटले आहेत,कापसाचे बोंड सडत आहेत,संपूर्ण पिक भुईसपाट व
पाण्याखाली गेले आहे करोना महामारीमुळे व बोगस बियाणे व औषधा मुळे आधीच शेतकर्याचे कंबरडे मोडले आहे,कर्जबाजारी पणा व बँकेचे उदासीनता आणि प्रशासनिक नाकर्तेपणा यामुळे
शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत,त्यातच हे अस्मानी संकट,या सर्व परस्थितीमुळे शेतकारी मेतकूटीला आला आहे.अजून पर्यंत पंचनामे करुन तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय प्रवक्ता डॉ.धर्मराज चव्हाण यांनी कंधार येथे केले.
दि.२१ रोजी कंधार येथिल शासकीय विश्रामा गृह येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले होते .त्यावेळी ते पत्रकार परीषदेत बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की तथाकथित नेते व मुख्यमंत्री फक्त बोलबच्चन करण्यात व शिवार पर्यटनात मग्न आहेत .काल पर्यंत शेतकऱ्याना पिक विमा न मिळाल्यास कंपनीचे कार्यालय फोडू म्हणणारे आज सत्तेत
आहेत.मग आत्ता का शेतकऱ्याने यांच्या गाड्या फोडायच्या का ,या अस्मानी संकटात शेतकऱ्याना मदत करणे हे शाषणाचे धोरण असाला हावे,पण तसे होताना दिसून येत नाही,मदतीसाठी राज्यसरकार केन्द्र सरकार कडे बोट दाखवतय व केंद्र राज्यसरकार कडे ,काहीही झाले तरी तुमचा आमचा पोशिंदा जगाला पाहिजे ,कर्ज काढा केंद्राला विनंती करून पिक विमा कंपन्याचे नियम शिथिल करयला सांगा, या गोष्टी करण्यास राज्यसरकार असमर्थ ठरत आहे
सर्व बाबी चा विचार करता वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करावा आशी मागणी करत आहे .
यावेळी सरदार चंदिसिंग बावरी, शिवकुमार नरंगले,इंजि.प्रशांत इंगोले,श्याम कांबळे,विठ्ठल गायकवाड,दैवताला पांचाळ,भिमराव बेंद्रीकर,देवानंद सरोदे,सुरेश गजभारे, साहेबराव थोरात, काकासाहेब डावरे, प्रशांत गवारे, दिलीप जोंधळे,संजय निळेकर,बबन जोंधळे आदींची उपस्थिती होती,
**– व्हीडीओ न्युज***वंचित बहुजन आघाडी