लोहा /प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील शिवणी जा येथे शाळा बंद पण शिक्षण चालू या मोहिमेअंतर्गत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी व कोणतीही मुल शिक्षणापासून वंचित राहू नये गेल्या सहा महिन्यापासून जागतिक महामारी करुणा मुळे सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत .
त्यामुळे गावातील मुलांना योग्य शिक्षण देण्यामध्ये सर्वच शिक्षक घरो घरी जाऊ शकत नाही पण आपल्याच गावातील आपल्या व शेजारील विद्यार्थ्यावर सेवा परम धर्म धर्म या न्यायाने शिक्षक मित्रांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे पवित्र कार्य करावे या सेवाभावी उद्देशाने शिक्षक मित्रांनी कार्य करावे म्हणून शिवणी जामगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील जामगे यांच्या अध्यक्षतेखाली गावातील शिक्षण प्रेमी मंडळीची शिक्षक मित्र म्हणून निवड करण्यात आली,
सर्व शिक्षक मित्रांनी या ज्ञानाच्या कार्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे मान्य केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री गादगे सर ,सहशिक्षक सौ पांचाळ मॅडम, सौ , जक्कललवार मॅडम ,सौ निकुरे मॅडम श्री वडवळकर सर ,श्री भुरे सर, पत्रकार गणपत जामगे ,त्रिंबक जामगे ,यांची उपस्थिती होती, सामाजिक सुरक्षित अंतर राखून कार्यक्रम संपन्न झाला,