भिकारी नको, शिकारी व्हा: ओबीसी जनगणना सत्याग्रहाच्या निमित्तानं

ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष – लोकजागर अभियान !
•••

ठरल्याप्रमाणे १८ ऑक्टोबर २०२० ला ओबीसी जनगणना सत्याग्रहाची महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात दणक्यात सुरुवात झाली. थेट कोकण, मुंबई, नवी मुंबई, मुंबई लगतची इतर उपनगरे, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा विविध भागात लोक सत्याग्रही / समन्वयक म्हणून समोर येत आहेत. पूर्व आणि पश्चिम विदर्भातील अकराही जिल्ह्यात सत्याग्रहींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गडचिरोली, गोंदिया सारख्या अगदी शेवटच्या टोकाला सुद्धा दणक्यात सुरुवात झाली.

विशेष म्हणजे यासाठी सरकार कडून कसलीही अपेक्षा न करता, स्वतःच्या खर्चाने हे काम लोक करत आहेत. प्रतिसाद अपेक्षेपेक्षा प्रचंड आहे. युवक देखील सक्रिय झालेले आहेत. विविध समाजातील, विविध संघटना आणि भिन्न भिन्न क्षेत्रातील मंडळी सहभागी होत आहेत. विविध पक्षातील लोकही जिद्दीने पुढे येत आहेत. तर काही लोक पक्षाने आम्हाला सहभागी होण्याचा आदेश दिला नाही, अशी सबब पुढे करत आहेत. पण तरीही आपण ह्यात सहभागी असायला हवे होते, अशी अस्वस्थता देखील त्यांच्या मनात आहे. आम्हाला खात्री आहे, आज ना उद्या तेही सहभागी झाल्याशिवाय राहणार नाहीत.

ओबीसींची संख्या ५२ टक्के आहे. एससी, एसटी, एनटी आदी समूह एकत्र केले तर ८५ टक्के बहुजन समाज होतो. पण हा समाज आजही सत्तेच्या बाहेर आहे. अंबानी – अदानी देशाला लुटत आहेत तर काही मोजकी घराणी महाराष्ट्राला लुटत आहेत. ही सरंजामशाही आणखी किती दिवस चालू द्यायची ? एखाद्या समूहाच्या दंडेली समोर सरकार कसे काय झुकते ? दहा टक्क्यांना न्याय जरूर द्या, पण त्यांना खुश” करण्यासाठी ८५/९० टक्के विद्यार्थ्यांच्या भवितव्याची कत्तल सरकारने का करावी ? ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला बर्बाद करणाऱ्या सरकारी निर्णयावर स्वतःला ओबीसी नेते म्हणवून घेणारे मंत्री चूप का आहेत ? एकीकडे हजारो, लाखो विद्यार्थांचे यामुळे नुकसान होणार, असा सहानुभूतीचा आव आणायचा आणि लगेच मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे, असे सांगून शेपटी टाकायची, असली ह्या नेत्यांची नाटकं आता ओबीसी, बहुजन समाजाच्या तरुणांनी खपवून घेता कामा नये.

मित्रांनो, आपले हक्क, आपला स्वाभिमान असे कुणाच्याही समोर गहाण टाकू नका. त्यासाठी आधी ओबीसी म्हणून एक या. ओबीसी आणि बहुजनांची एकजूट व्हावी, अस्मिता जागी व्हावी, यासाठी हा ओबीसी जनगणना सत्याग्रह आहे.

• ५२ टक्के ओबीसी, ५२ टक्के आरक्षण !
• आमची जनगणना आम्हीच करणार !

• ओबीसी मुख्यमंत्री, बहुजन सरकार !

ह्या त्रिसूत्री मधील पहिलं पाऊल म्हणून लोकजागर अभियान तर्फे हा जनगणना सत्याग्रह सुरू करण्यात आलेला आहे. आपण त्यात तन – मन – धनाने सहभागी व्हा. आपल्याला १०० टक्के जनगणना स्वतःच्या भरवश्यावर पूर्ण करायची आहे, याचा निर्धार करा. सरकारची वाट बघत वेळ दवडू नका.

नेत्यांचा नाद सोडा. ते स्वतःच कुणाचे तरी गुलाम आहेत. त्यांना समाजाशी, जनतेशी, तुमच्या आमच्या सुखदुखाशी काहीही देणेघेणे नाही. असल्या गुलामांच्या नादी लागू नका. आपली ताकद ओळखा, भिकारी नव्हे, शिकारी व्हा !

सामाजिक समता, सांस्कृतिक समता, आर्थिक समता, धार्मिक समता, राजकीय समता प्रस्थापित करणे हे लोकजागर अभियानचे स्वप्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा सत्याग्रह आहे. त्यात सहभागी व्हा. लोकजागरचा अकरा कलमी कार्यक्रम समजून घ्या.

१. झिरो ते हिरो अर्थव्यवस्था
२. जनतेचा उमेदवार, लोकांची लोकशाही
३. गाव तिथे उद्योग, घर तिथे रोजगार
४. कृषी धर्म, कृषी संस्कृती
५. सामाजिक उद्योग, सामाजिक सरकार
६. मोफत शिक्षण, मोफत आरोग्य
७. एक गाव, एक परिवार
८. युवा भारत, नवा भारत
९. गतिशील न्यायालये, पारदर्शी न्याय
१०. प्रगत महिला, समर्थ समाज
११. सर्वसमावेशक समाज, सर्वसमावेशक सत्ता

लोकजागर अभियान आणि ओबीसी जनगणना सत्याग्रहात आपले स्वागत आहे.

ओबीसी जनगणना सत्याग्रह – हे पेज लाईक करा..

https://www.facebook.com/groups/265170331391651/?ref=share

तूर्तास एवढंच..


ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर अभियान
•••
एम. एस. मिरगे
महासचिव
लोकजागर अभियान

ओबीसी जनगणना सत्याग्रह संपर्क प्रमुख
• मनीष नांदे – प्रदेश संघटक
9545025189
• डी. व्ही. पडिले – मराठवाडा
9890585705
• मुंबई विभाग – रवींद्र रोकडे
9773436385
• कोकण विभाग –
चंद्रकांत लोणारे –
9960014116
समीर देसाई
9004048002
• पश्चिम महाराष्ट्र –
चंद्रकांत लोणारे
9960014116
राजकुमार डोंबे
7378583559
• उत्तर महाराष्ट्र – चंद्रकांत लोणारे
9960014116
• अमरावती विभाग – प्रभाकर वानखडे
8806385704
• नागपूर विभाग – महेंद्र शेंडे
8055502228

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *