लोहा / प्रतिनिधी
सामाजिक शैक्षणिक व धार्मिक कार्यात सदा अग्रेसर असणारे रियल कोरोना फायटर म्हणून लाॅकडाऊन व कोरोना च्या काळामध्ये व उल्लेखनीय कार्य करणारे वेळोवेळी गोरगरीबांना मदत करणारे धार्मिक कार्यात पुढाकार घेणारे व मदत करणारे लोहयाचे भूमीपुत्र सुप्रसिद्ध बांधकाम उद्योजक तथा दत्ताभाऊ मित्रमंडळाचे सुप्रीमो दत्ताभाऊ वसमतकर यांना जनसेवा करतांना न कळत कोरोनाची बाधा झाली होती. या कोरोनाशी लढ्ढा देऊन मोठ्या हिम्मतींने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नांदेड येथे वैद्यकीय उपचार घेऊन यशस्वीपणे मात केली.
त्यांचे लोहा शहरात आपल्या निवासस्थानी आगमन झाल्यानंतर त्यांचा सत्कार अनेक मित्रमंडळीनी केला .
यावेळी गजानन पाटील चव्हाण , बुलढाणा अर्बन बँकेचे मॅनेजर केशव शेटे, मुन्ना होणराव, पत्रकार विलास सावळे, पत्रकार युनूस शेख , पत्रकार संजय कहाळेकर, शिवराज पवार, ज्ञानोबा घोडके , हरीभाऊ शेटे, विठ्ठल मानसपुरे, गोविंदराव डोम, राजू शेटे , माधव वसमतकर, कदम मामा
आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दत्ताभाऊ वसमतकर म्हणाले कोरोना या आजाराला नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही हा आजार झाल्यानंतर अनेक नागरिक हे टेन्शन घेत आहेत मानसिक दडपणाखाली येत आहेत त्यामुळे बिमारी लवकर नीट व्हायची ते वाढत आहे तेव्हा कोरोनाशी लढा देताना डॉक्टरच्या सूचनेनुसार औषधोपचार करावा गावठी कोणताही उपचार करू नये अंधश्रद्धा पाळू नये आजार झाला नंतर तात्काळ दवाखान्यामध्ये भरती व्हावे अंगावर आजार काढू नये घरी बसू नये सोशल डिकस्टेशन पाळावे आजार काळामध्ये कुणालाही भेटू नये . गरम पाणी प्यावे सूट मिरे लंवगाचा गरम डिकाशन चहा घ्यावा दिवसातून दोन चार वेळा घ्यावा.
ऊना मध्ये सकाळी अर्धा तास किंवा दहा पंधरा मिनिटे थांबावे हा आजार बरा होतो.
कोरोना हा आजार होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यावी सोशल डिकटेक्शन पाळावे नाकाला तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा सॅनीटायझर वापरावे या त्रिसूत्रीचा वापर करावा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये गर्दी टाळावी .
कोरोना झाल्यानंतर आपल्या कुटुंबियांशी मित्रमंडळींशी संपर्कात येऊ नये . आपल्या सर्व लहान थोराच्या आशीर्वादाने , ईश्वराच्या कृपेने व डॉक्टरांनी केलेल्या उपचारांनी मी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
आपले शहर आपला जिल्हा आपले राज्य व आपला देश कोरोना मुक्त व्हावे अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो असे दत्ताभाऊ वसमतकर म्हणाले.