जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानात तीन महिन्यांची साखर उपलब्ध
नांदेड ;
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने ऑक्टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2020 साठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो (प्रति महिना) याप्रमाणे मंजूर केले आहे. सदर महिन्यात जिल्ह्यासाठी 2 हजार 94 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधित स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरण करण्यात येणार आहे.
तालुका निहाय नियतन (क्विंटलमध्ये) पुढील प्रमाणे देण्यात आले आहे. नांदेड-193.5, अर्धापूर- 39, मुदखेड-33, कंधार-73.5, लोहा-147.5, भोकर-86.5, उमरी-54.5, देगलूर-135.5, बिलोली-105, नायगाव- 130.5, धर्माबाद-65, मुखेड-198, किनवट-454.5, माहूर-209, हदगाव-80, हिमायतनगर-89 याची सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
#nanded #नांदेड #Shugar