नांदेड ( प्रतिनिधी)
सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर केली. हि मदत गुंठ्याला १०० रुपये केवळ शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा आरोप मराठा महासग्रांम संघटनेचे सुनील हराळे पाटील यांनी केला आहे.
या वर्षी राज्यात सर्वत्र सतत पाऊस सुरू राहल्याने पिकांचे पुर्णपणे नुकसान झाले आहे.सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये मदत जाहीर करणे अपेक्षित होते. पंरतु सरकारने भुमराव करीत अतिवृष्टी शेतकऱ्यांना तोडकी मदत जाहीर करून राज्यातील शेतकऱ्यांना वा-यावर सोडण्याच काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे.
राज्यात जुन ते ऑक्टोबर २०२० दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली आहे. हि घोषणा शेतक-यांना घुमराव करणारी असुन शेतक-यांसाठी अन्यायकारक आहे. खुर्चीवर बसुन बोलणे आणी शेताच्या बांधावर जाउन वस्तुस्थिती जाणुन घेणे यातिल फरक अजुन सरकारला कळला नसावा.
मुंग,उडिद,मका,सोयाबिन ईतर पिकाचे शुन्य उत्पन्न आहे. अशा परिस्थितीत तोडकि मदत जाहिर करुन शेतक-यांची चेष्टा करणे हे सरकारला चांगलेच महागात पडेल. हि सरकारने केलेली घोषणा शेक-यांना अजिबात मान्य नाहि. त्यामुळे लवकरच मराठा महासग्रांम संघटनेचे मा. राजकुमार सुर्यवंशी पाटील यांचा नेत्तृत्वात शेतक-यांच्या प्रश्नावर राज्यव्यापी आंदोलन उभे करुन शेतक-यांना सरसकट भरिव नुकसान भरपाई मिळवुन देऊ असे मराठा महासग्रांम संघटनेचे अध्यक्ष सुनील हराळे पाटील यांनी आमच्या प्रतिनाधिशी बोलतांना सांगितले.
****** video news***** ही तर शेतक-यांची थट्टाच