विज्ञानेश्वरा कधी करशील रे कोरोनासुराचा वध…?

                         

                   

सध्याचा काळ हा कोरोना महामारीचा असल्यामुळे संपूर्ण विश्वावर संकट कोसळले आहे.जवळपास जैविक युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.जगात दोन-सव्वादोनशे देशांमध्ये कोरोना विषाणूचे थैमान पहायला मिळते आहे.कोविड-19 हा जीवघेण्या विषाणुने आपले जाळे घट्ट केले असून, जवळपास लाख दोन लाख लोकांचा बळी घेतला आहे. आपण पुराणात पाहतो की महिषासुर या असुराचा जो कांही हौदोस सुरु होता,त्यावेळी या आसुराला संपवण्यासाठी आदीमाया शक्तीच्या दुर्गादेवीला  महिषासुराचा वध करण्यासाठी यावं. लागलं. म्हणून मला असं वाटतं की,विज्ञानेश्वरा कधी  करशील तू कोरोरासूराचा वध…!हा यक्ष प्रश्न यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवात पडला आहे.   आणि या कोणाच्या संकटातून या विश्वाला वाचशील कारण आज येथे उद्या येतील दोन दिवसाला दोन महिन्यात येईल या या आशेवर विश्वामध्ये सर्वजण जगताहेत…!

जरी आपण सोशल डिस्टंसिंग,वेळोवेळी सॅनिटाईजर,मुखी मास्क लावणे,गर्दीत न जाणे,अशा अनेक उपाययोजना करुन संसर्गा पासून दुर राहणे ही काळाची गरज बनली आहे.महिषासुराच्या अन्यायाचा अतिरेक झाल्यामुळे दुर्गादेवीने त्या आसुराचा बिमोड करतांना नऊ दिवसाच्या कार्यकाळ लागला.विजयी दुर्गा मातेनीं मिळविल्या नंतरचा विजयोत्सव म्हणजे विछया दशमी(दसरा) होय.पांडव-कौरव यांचे युध्द सुरु होते त्यावेळी पांडवानी आपली शस्त्रास्त्र ही शमीच्या वृक्षास अडकवली होती.तसेच रामायणात प्रभु श्रीरामानीं रावणावर विजय मिळविल्या नंतर विजयोत्सव केला.त्यास विजया दशमी म्हणतो.विजया दशमीस शस्त्र पुजनही केले जाते.

पण हल्लीचा काळ जगभरात कोरोना महामारीचे संकट आ वासून उभे आहे.जगात याची सुरुवात चीन देशात जवळपास डिसेंबर 2019 पासून या चीन निर्मित कोरोना विषाणुने जगभर जीवघेणा फास मानवांच्या गळ्याभोवती आवळला आहे.आपल्या भारत देशातही मार्च महिन्यात आला.तेंव्हा भारत सरकारने 22 मार्च 2020 जनता कर्फ्यू लावतांना..महामहिम पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींजीनी 21 मार्चच्या रात्रौ 8 वाजता देशाला उद्देशून आवाहन करतांना वरील घोषणा केली.त्या नंतर 25 मार्च 2020रोजी पुन्हा देशवासीयांना आवाहन करतांना 26 मार्च 2020 ते 14 एप्रिल 2020 पर्य॔त 100% लाॅकडाउनची घोषणा करत या कोरोना विषाणुच्या विरोधात रणशिंग फुकले.त्यास देशवासीयांनी सहकार्य केले.ही महामारी नसून मानवाने विज्ञानाच्या जोरावर निर्माण केलेली जणुकांही जैविक युध्दाची नांदीच आहे असे वाटते.जवळपास एक वर्ष होत आहे,यावर जगातील सर्वच संशोधक कोरोना लस शोधण्यात आपले ज्ञानपणाला लावत आहेत.आम्हाला विजयादशमीचा आनंद तेंव्हाच मिळेल,जेंव्हा कोरोना वॅक्सीनचा शोध लागेल.अन्यथा जीव मुठीत धरुन कोरोना विषाणुच्या विळख्यात जगतांना जीव टांगणीला लागलेलाच असेल……

हा वायरस निसर्ग निर्मित नसुन चीनी ठुसक्या प्रवृत्तीने विज्ञानाच्या बळाव त्याची निर्मिती केल्यामुळे त्या विषाणुचे उच्चाटन करण्याची लस शोधण्यास विलंब होत आहे.परंतू आज पर्यंत संसर्गजन्य आजारावर प्रभावी लस शोधण्याचा हातखंड हा भारतीय संशोधकांचा आहे.संसर्गजन्य आजारावर संशोधन करणार्या 16 संशोधन शाखा भारतात आहेत.त्यांचे प्रमख डाॅ.गंगाखेडकर यांनी सांगीतलेकी लस शोधण्यास विलंब होईल पण भारताची लस संसर्गजन्य आजारावर प्रभावी असते हे आज पर्यंत सिध्द झाले आहे.

अमेरिकेतील डिजीज कंट्रोल प्रिव्हेंशन सेंटर यांनी नोव्हेंबर 2020 पासून लस वितरणाच्या सुचना दिल्या,संचालक राबर्ट रेडफिल्ड यांनी 17 ऑगस्ट दिनी अमेरिकेतील सर्व राज्यांच्या गव्हर्नरांना पत्र लिहून मार्ककेसन कार्प कडुन परवाना अर्ज मिळतील असं म्हणटले आहे.कार्प यांनी राज्याचे आरोग्य विभाग आणि दवाखाण्यासह विविध ठिकाणी लस मिळेल,सीडीसी सोबत करार केला आहे.

असे नमुद केले पण…असा अंदाज सांण्यात आला.रशियाने कोरोना लसी बाबत इंग्लड,अममेरिका,चीन या देशांना   पण रशियाच्या लसची पुष्टी झालेली नाही.पण कोरोनाची लस रशियाने प्रथम काढल्याचा दावा केला आहे.त्या लसीचा पुरवठा जगभर होईल असे भाकीत केले आहे.फक्त बातम्यावर बातम्याच येत आहेत पण….लस यशस्वी झाल्याची बातमीची उत्कंठता जगाला लागली आहे.चीनने तर आपली चुक मान्यच करत नाही.पण कोरोनाचा उगम चीन देशातील हुवान शहरच आहे,हे जगमान्य जाले आहे.यात कांही दुमत नाहीच…!रेमडेसिवर हे इंजेक्शन सध्या वापरले जात आहे….पण त्यातही काळा बाजाराचा गोरखधंदा हल्ली सर्वत्र दिसत आहे. याचा खेद वाटतो..!

Thegnardian.com ने दिलेल्या वृत्तानुसार 10 ऑगस्ट पर्यंत मुख्य लसीला मंजुरी देण्यात आली,असे रशितन अधिकार्यांनी नमुद केले होते.या शिवाय भारत,ब्राझील या सह अनेक ठिकाणी लस विक्री करण्याची रशियाची इच्छा आहे.विशेष म्हणजे लशीच्या परिक्षणा दरम्यान संशोधकांनी ही लस टोचून घेतली.वृत्तात असे म्हणटले जात आहे की,रशियन लस देशातील श्रीमंत लोकांना मिळण्यास सुरुवात झाली आहे.रशियाचे वाणिज्य मंत्री डेनिस मॅन्तूरोव यांनी म्हणटले आहे,एक महिन्यात कोरोना लशीचे लाखो डोस तयार करु शकतो असा दावा केला आहे.पुर्वी रशियाचे आरोग्य मंत्री मिखैल मुराश्को यांनी म्हणटले होते की,

क्लिनिकल ट्रायल पुर्ण झाली आहे.आता फक्त कागदी प्रक्रिया सुरु आहे.जगभरात करोना वॅक्सीन काढण्याचे प्रयत्न प्रगती पथावर असतांना,भारतात तयार झालेली लस मात्र नाखातेन दिली जावू शकते.लशीसाठी वाॅशिंग्टन युनिव्हरसिटी स्कुल ऑफ मेडिसीन सोबत करार केला आहे.हैद्राबादमध्ये असलेले भारतीय बायोटेक “क्लोरोफ्लू” नावाची लस विकसित करत आहे. ही लस यशस्वी झाली तर नाकतून 1 थेंब देण्यात येईल,ही लस अमेरिका,जपान आणि युरोपमध्ये वाटप करण्याचे अधिकार मिळवले आहेत.भारत बायोटेचे डाॅ.कृष्णा एला यांनी लशीचे 100 कोटी डोस बनविणार असल्याची माहिती दिली.लस स्वस्त आहे ती नाकातून देया येते अशी माहिती दिली.उंदरावर लशीची यशस्वी चाचणी झाली आहे.इंग्लडची ऑक्सफर्ड कंपनी भारतातील सिरम या दोन कंपण्यानी संयुक्त संशोधन करुन लस या महिन्या अखेरीस येण्याचे भाष्य केले.पण प्रत्यक्ष लस केंव्हा सर्वसामान्या पर्यंत पोहचेल याची उत्कंठता जगालाच आहे.ज्या दिवशी विज्ञानेश्वराने कोरोनासूराचा वध करील त्या दिवशी खरी विजयादशमी साजरी करण्याचे भाग्य लाभेल.

 आज घडीला आपण म्हणतो संसर्गाची संख्या कमी झाली पण मला वाटते बरेच जण घरी कोरोंटाईन राहून उपचार घेत आहेत.आपण म्हणतो आहोत संख्या कोरोना बाधीतांची कमी झाली,हा दावा कितपत सत्य आहे.जवळपास 2020 हे वर्ष जगासाठी महासंकटापेक्षा काय कमी आहे काय?ही तर जैविक युध्दाची चाहूल चीन ड्रॅगने जगाला दिली आहे.या पुढे भविष्यात मानवी जीवावर संक्रांत येणारच हे मात्र निश्चित आहे.कोविड-19 या विषाणुने जगभरातील लाखो जन मृत्यूमुखी पडले आहेत.कोट्यावधी लोक बाधित झाले.डाॅक्टर,नर्स,सैनिक,संशोधक,केमिस्ट अॅड ड्रगीस्ट, पोलिस,पत्रकार,स्वच्छता दुत,बॅक कर्मचारी,विद्युत मंडळाचे प्रकाशदुत, महानगर पालिका,नगरपालिका,ग्रामपंचायत,अंगनवाडी शिक्षिका,सेविका,आशावर्कर,सामाजिक संस्था,गुरुव्दारा साहिब,मंदिरे,प्रार्थना स्थळे मठ,महसूल विभागातील कर्मचारी,जिल्हाधिकारी कार्यालय,प्रधानमंत्री,केंद्रीय मंत्रीमंडळ, सर्व राज्याचे मुख्यमंत्री व सर्व मंत्रीमंडळ, संस्थाने,साहित्यिक,कवि,राजकिय कार्यकर्ते यांनी या कोरोना महामारीत जनसेवेचा वसा घेवून अहोरात्र कार्य केले.त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा!

…लस संदर्भातील छपाई प्रसार माध्यमावर आणि दृकश्राव्य माध्यमावर अनेक बातम्या कोरोना लसी संदर्भात आल्या पण….विश्वसनिय वृत कधी वाचले किंवा पाहिले नाही.अपेक्षा एवढीच की लवकरात लवकर लस तयार होवून…..जगातील मानव जातीचे प्राण वाचवण्यास मदत होईल अशी आशा वाटते.तारीख पे तारीख आत वाढवू नये म्हणजे झाले.सध्या शाळा,महावाद्यालये,बाजारहट्ट,विवाह सोहळे,किर्तन,प्रवचने,व्याखाने,प्रबोनपर कार्यक्रम,धार्मिक सण-उत्सव,प्रार्थना स्थळे,सत्याग्रहे,अंदोलने, रल्वे,विमान वाहतुक पुर्णतः बंद आहेत.या मुळे देशाची अर्थव्यवस्था आयसीयुमध्ये आहे.या विषाणुने कहर केला आहे,जो-तो भीतीच्या वातावरणात जगतो आहे.लस निघणार आहे या आनंदी बातम्यांच्या आशेवर आज जगते आहे.पण केंव्हा येणार हे ठामणे कुणी सांगु शकत नाही.लस काढणारा प्रत्येक देश चाचण्यावर चाचण्या करतो आहे.यश मात्र फक्त अपेक्षा ठेवून आहे.ज्या दिवशी कोरोनावर प्रभावी लस निघेल म्हणजे विज्ञानेश्वर संशोधकांच्या मदतीने यश मिळवून कोरोनासुराचा वध करेल त्या दिवशी आनंदाचे सोनं लुटून खरा विजया दशमीचा आनंद घेता येईल…

.अन्यथा…लस शोधण्याच्या प्रक्रियेतच संशोधकांना राहवे लागेल…एवढे मात्र नक्की आज पर्यंत भारतानेच तयार केलेल्या संसर्गजन्य आजारावर 100% यश मिळाले…भारत देशाचा लस शोधण्यात सहभाग महत्वाचा हे मात्र ठळक नमुद करावे लागेल. 

लेखन-

dattatrya yemekar
dattatrya yemekar

-गोपाळसुत

दत्तात्रय एमेकर गुरुजी.

क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

   9860809931

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *