नांदेड ;
आज शहरातील काही भागातून जमिनीतून गूढ आवाज आले त्याबाबत खालील माहिती आहे.
11.08am ( 0.6 रिष्टर स्केल )
11.32am ( .0.8 रिष्टर स्केल )
वरील दोन वेळेला सिसमोग्राफ वर नोंद झालेली आहे.
असे धक्के जर सातत्याने आणि वाढते जाणवले तरच काळजी करण्यासारखे असते अन्यथा काळजी करण्याचे कारण नाही..
सर्वसाधारणपणे 5 रिष्टर स्केल पर्यंत स्पंदने जाणवली तरी फारसा फरक पडत नाही
विद्यापीठाच्या उत्तर पूर्वेकडे साधारण 9 किलोमीटर अंतरावर या धक्क्यांचा केंद्रबिंदू ( ईपीसेंटर ) होता
अत्यंत छोटे धक्के असल्याने परफेक्त केंद्रबिंदू ( ईपीसेंटर ) कळणे कठीण असते.