कंधार ;
माझ्या सारख्या सामान्य कुटूंबातील एका सदस्या ला फुलवळ येथिल साधु ,संत ,महंत व येथिल जनतेने मला आशीवाद रुपाने मतदान करुन फुलवळ गावचा सरपंच बनवले हा मोठा आशीवाद माझ्यासाठी होता.माझ्या कारकिर्दीत असंख्य काम केलो व काही शिल्लक राहीले असले तरी आगामी काळात सतत माझी गावच्या विकासात मोलाचे योगदान राहील असे प्रतिपादन फुलवळ गावाचे सरपंच बालाजी देवकांबळे यांनी त्यांच्या समारोप प्रसंगी युगसाक्षी ला बोलताना केले.
बालाजी देवकांबळे म्हणाले की दि. 25 आॅक्टोबर 2020 रोजी माझ्या सरपंच पदाच्या कारकिर्दीचे पाच वर्ष पुर्ण झाले.आपण सर्व मायबाप,जनता – जनार्धनाच्या आशीर्वादाच्या बळावर फुलवळ नगरीच्या सरपंच पदाचा कार्यकाळ मी पुर्ण करु शकलो.हा गावगाडा हाकताना मला प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरीत्या साथ देनारे,वेळोवेळी पाठीवर कौतुकाची थाप देनारे,चुकेल तिथे योग्य दिशा दाखवनार्या वडिलधार्या मंडळींचे मनस्वी आभार.
या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आपण बरीच कामे केली बरीचशी कामे काही त्रुटींमुळे राहिली यातच कोरोणा सारख्या महाभयंकर विषाणुने आपल्या गावात हातपाय पसरन्याचा प्रयत्न केला परंतु आपल्यावर आलेल्या या संकटाचा आपण सर्वांनी नेटाने सामना करत या दानवावर एकजुटीने व एकसंघ मेहनतीने मात केली.माझ्या या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जर मी कुठे प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष रीत्या कमी पडलो असेन तरी आपण सर्व जण मोठ्या मनाने आपला लहान भाऊ समजुन क्षमा करचाल या अपेक्षेने मी सर्वांचा निरोप घेतो.सर्व गावकरी मंडळींचे पुनश्च एकदा मनस्वी आभार मानून सदैव गावच्या विकासासाठी धावून येणार असल्याचे सांगितले .