नांदेड :- 31/10/2020
नांदेड भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालयाच्या वितीने स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती “राष्ट्रीय एकता दिवस ” ” तसेच देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यातीथी निमित्त “ राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून ” साजरे करण्यात आलेत. तसेच वाल्मीक ऋषी यांची जयंती सकाऊट गाईड जिल्हा कार्यालयात साजरी करण्यात आली.
संपुर्ण भारत देशात वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात येतो. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळेच संपुर्ण भारत एकसंघ होऊ शकला. या प्रसंगी त्यांच्या जीवन चरित्रावर शब्दरुपी प्रकाश टाकण्यात आला त्यांनतर उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. याप्रसंगी सहाय्यक लिडर ट्रेनर (गाईड) श्रीमती बी.एम. बच्चेवार, सहसचिव श्रीमती एम.बी. झाडबुके, सहाय्यक लिडर ट्रेनर (स्काऊट) श्री. प्रलोभ कुलकर्णी, जिल्हा संघटक स्काऊट/गाईड दिगंबर करंडे , श्रीमती शिवकाशी तांडे, स्काऊटर एस. एम. खान, मयुर भाताडे कार्यालयाचे कर्मचारी कैलास कापवार, साईनाथ ठक्कुरवार इत्यादिंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.