कंधार ; दत्तात्रय एमेकर
विदर्भातील पोहरादेवी मठ संस्थानचे मठाधिपती,बजारा भुषण,बालयोगी पो.भ.प.वंदनीय गुरुवर्य संत रामराव महाराज(बापु महाराज) यांना काल कोजागरी पौर्णिमेच्या दिनी मुंबई येथील रुग्णालयात रात्री 11 वाजता.वंदनीय महारांजांची प्राणज्योत मालवली.
बालयोगी महंत रामराव महाराज यांनी गुराखी गडी जागतिक गुराखी साहित्य संमेलनाचे उदघाटक म्हणुन उपस्थित होते.त्या गुराखी साहित्य संमेलनात माझ्या कलेच्या प्रदर्शनाचे उद्घाटन वंदनीय मठाधिपती रामराव महाराज यांच्या समर्थ हस्ते उद्धाघन केले.हे माझे खरचं भाग्यच होते.त्याचा आहार हा शिजवलेले अन्न पेक्षा फलाहार ते आयुष्यभर घेतले.हे वंदनीय महाराजांचे खास वैशिष्ये होते.त्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी आपले उभे आयुष्या खर्ची केले.सर्व गोरमाटी बंजारा समाजाचे भुषण होते.त्यांनी मानवता धर्माची शिकवण जगाला दिली.
त्यांच्या देहावसनाची बातमी वार्यासारखी सर्वत्र पसरताच त्यांचे अनुयायी दु:खी झाले.सकाळी बहाद्दरपुरा येथील महाजनाच्या मळ्यात बालयोगी आनंदगीर महाराज मठ संस्थान बोरगाव,आसर्जन,बहाद्दरपुराचे वंदनीय दे.भ.प.आनंदगीर दत्तगीर महाराजांचा वाढदिवस साजरां करण्या आधी महंत वंदनीय पो.भ.प. रामराव महाराज यांना आदरांजली अर्पण करुन वंदनीय आनंदगीर महाराजांना प्रकटदिना निमित्य अभिष्टचिंतन करण्यात आले.या कार्यक्रमा प्रसंगी अमोल वंजे,वडेपुरीकर,सिनगारे,दत्तात्रय एमेकर गुरुजी सह अनेक भक्तगण उपस्थित होते.
सायंकाळी कंधारच्या शिवाजी नगरात रमेश राठोड सरांच्या “सुंदरकुंज”या निवासस्थाना समोर वंदनीय पो.भ.प. संत रामराव महाराज यांना आदरांजली वाहाण्या आली.प्रथम सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रल्हादराव जाधव यांच्या समर्थ हस्ते माल्यार्पण करुन उपस्थित अनुयांनी पुष्प अर्पण केले.जि.प.प्राथमिक शाळा बाभुळगावचे मुख्याध्यापक ऊल्हास राठोड सर व योगगुरु नीळकंठ मोरे सर यांनी वंदनीय महाराजांचे चरित्र सांगितले.जि.प.प्राथमिक बोरी(वाखरड)चे मुख्याध्यापक मेहरबान राठोड सर,जि.प.शाळा आलेगावचे सहशिक्षक रमेश राठोड सर,अॅड.नरेंद्र राठोडकर,जि.प.शाळा हरिलाल तंडाचे सहशिक्षक काशिनाथ पवार सर,दत्तात्रय एमेकर गुरुजी,करण मुंडे,शशांक राठोड,श्रीधर मुंडे आदी जण उपस्थित होते.