लोहा ; प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील मौजे पेनुर येथे ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन दि.३१ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक छत्रपती दादा धुतमल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोहा पंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा नगरसेवक विनू सावकार पापीनवार , विलास जोंधळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मारोती कांबळे , स्वाभिमानी भीमसेनेचे लोहा-कंधार विधानसभा प्रमुख तथा पत्रकार विलास सावळे पत्रकांर यूनूस शेख, विनोद महाबळे, बाळासाहेब बुध्दे,शिवराज पवार, ग्रामसेवक डी.पी.राठोड,सचीन आढाव आदी मान्यवर
उपस्थित होते.
यावेळी प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉ.बाबासहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक छत्रपती दादा धुतमल व प्रमुख पाहुणे उपसभापती नरेंद्र गायकवाड , व नगरसेवक विनू सावकार पापीनवार यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आला व त्यानंर सामुदायिकरीत्या त्रिशरण, पंचशील ग्रहण करून बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी बोलताना उपसभापती नरेंद्र गायकवाड म्हणाले की,पेनूर येथील बौद्ध वस्तीत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून ७ लक्ष रुपये निधी बुद्ध विहाराच्या सभागृहासाठी मंजूर करूत
७ लक्ष रुपये निधी सभागृहासाठी लागतो व त्यानंतर वरचे स्तुपाचे काम समाज बांधवांनी वर्गणी जमा करून करावे जसे आम्ही हरसद येथे केले. तसेच ग्रामसेवकाने येथील रंगरंगोटी व झेंड्याचे काम तात्काळ करावे असे आदेशही त्यांनी ग्रामसेवकांना दिले.
तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 14 तारखेला फार महत्व आहे. 14 एप्रिल ला त्यांचा जन्म झाला, ते आपल्या आई वडीलाचे चौदावे रत्न होते, त्याने 14 ऑक्टोबरला धम्मदीक्षा घेतली . डॉक्टर बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे मी लोहा तालुक्याचा उपसभापती आहे . मला खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम करण्याची संधी दिली.खा. प्रतापराव पाटील चिखलीकर जिल्हा परिषद सदस्या प्रणीताताई देवरे, जि.प. सदस्य प्रविण पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून हरसद येथे 25 लक्ष रुपयांचा निधी आणून कामे केले, त्याचप्रमाणे त्यांच्या माध्यमातून पेनूर येथे विकास कामे करू असे उपसभापती नरेंद्र गायकवाड म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपासक ,उपासिका व गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक नागोराव एडके ,चंद्रकांत एडके , संभाजी एडके आदीने परिश्रम घेतले. कार्यक्रम सोशल डिस्टिंक्शन पाळून संपन्न झाला.