कंधार:दत्तात्रय एमेकर
मन्याड खोरे असे नाव कानी पडताच आठवते चळवळीचा कंधार तालूका हा डाॅ.केशवराव धोंडगे यांच्या कार्याची ओळख आहे.पुर्वी निवडणुकीत म्हणटल्या जायचे”धोंडगेंचा गाडा,दिल्लीला धाडा!” मला वाटते देशात सत्ताग्रहाची सुरुवात म.गांधीजींनी केली खरी!पण आपल्या लढवय्य वृत्तीने संपुर्ण भारतात कल्पक अन् रेकाॅर्डब्रेक सत्याग्रह करण्याचा हातखंड मन्याड खोर्यांचा वयाची शंभरी पार करणारा चीरतरुण ढाण्या वाघ म्हणजे डाॅ.भाई केशवराव धोंडगे.यांनी आज दि.2 नोव्हेबर 2020 रोजी.सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत चालणारे, कंधार मामलेदार कचेरी पुढे एक दिवशीय धरणे अंदोलनास पाठिंबा देण्यासाठी डाॅ भाई धोडगे हे सत्याग्रहीवीर सोबत धाकले सुपुत्र माजी नांदेड जि.प.सदस्य डाॅ.प्रा.पुरुषोत्तम धोंडगे सहभागी होते.
मामलेदार साहेब यांनी डाॅ.भाई धोंडगे यांना भेटून ही मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लागलीच पाठवतो असे चर्चे अंती सांगीतले.आज पर्यंत त्याच्या लढवय्ये वृत्तीमुळे अनेक अधिकार्यांना घाट फुटत तीच परिस्थिती पाहायला मिळाली.कोरोना महामारीच्या काळात वयाची तमा न बाळगता चीरतरुण मर्दुमकीचा बाना दाखवला.या वयात विश्रांती न घेता अविरत जनसामान्यांसाठी लाढावू वृत्ती आजच्या तरुणाईला अश्चर्यांचीच वाटते. त्याच वेळी शिवच्या गणपतीकडे जाणार्या रस्त्याची मागणीही पुर्ण करा असे सुतोवाच करताच मामलेदार साहेबांनी पाठपुरावा करतो असे सांगीतले.त्यांचे सुपुत्र डाॅ.प्रा.पुरुषोत्तम धोंडगे यांनी या अंदोलन कर्त्यांची योग्य आहे.मेट्रो ट्रेन,माॅल,बाजार यांना परवानगी मिळाली पण या संघटनेच्या व्यवसायीकांना नियमाच्या अधिन राहून परवानगी दिल्यास या व्यसायीकावर उपासमारीची वेळ येणार नाही.यांच्या सहित छोट्या मोठ्या व्यावसायीकांनाही परवानगी देवून त्यांचेवर उपासमारीची वेळ येणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी असे आपल्या मनोगतात बोलून दाखवली.
या अंदोलन कर्त्यांची मागणी 500 व्यक्तींच्या उपस्थित लग्न सोहळे करण्याची परवानगी आणि मंडप डेकोरेशन,मंगल कार्यालय,होल,लाॅन यांच्या जागेच्या 50% परवानगी द्यावी,अशी मागणी अंदोलन कर्त्यांची होती.
गेल्या आठ महिन्या पासून कोरोना महामारीच्या संकटामुळे लाॅक डाउनच्या परिस्थितीमुळे टेंट हाऊह,मंडप डेकोरेशन,मंगल कार्यालय,बॅक्वेट हाॅल,केटरर्स,साऊंड,डि.जे.,लाईट डेकोरेशन,फ्लावर डेकोरेशन,छायाचित्रकार,पुरोहित,आचारी,बॅन्डवाले,घोडेवाले,बलून डेकोरेशन,ऑकेस्ट्रा,रथ,मेणावाले,फेटेवाले,बग्गीवाले आणि या मंगलमय सोहळ्यावर उपजीवीका करणारे लहान-सहान व्यवसायीक यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे.
यापुर्वी अनेक वेळा शासन दरबारी निवेदने देवून सर्वांची आर्तकिंकाळी मांडली पण…लग्न सोहळ्यास मान्यता 50 व्यक्तींच्यावर परवानगी दिलेली नाही.टेंट हाऊस,मंगल कार्यालय,केटरर्स,डेकोरेशन,ओनर्स वेल्फेअर असोशियशन कंधार यांना नाईलाजास्तव एक दिवसीय अंदोलन करण्याची वेळ आली आहे.या मागणीस वयाच्या शंभरीत असलेले सत्याग्रहवीर,मन्याडीच्या चीरतरुण ढाण्या वाघांनी पाठिंबा देवून त्यांची मागणी न्याय आहे.त्यांना भेटण्यासाठी विजय चव्हाण साहेब मामलेदार कंधार यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी पाठपुरवा केला आहे. आजचे अंदोलन मागे घेवून प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती.अध्यक्ष परमेश्वर माणिकराव पेठकर यांना लेखी निवेदनाने केली.त्यांची प्रत ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,सत्याग्रहीवीर,माजी खासदार व आमदार डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांना दिली.
या प्रसंगी अनेकांनी या अंदोलनास पाठिंबा दर्शवून उपस्थित अंदोलनकर्त्याचे मनोबल वाढवून,लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
***** video news