व्हाॅटसअॅप पोस्टबाबत संबंधित पोलीस स्टेशनचे आवाहन
नांदेड – गंगाधर ढवळे
जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत त्या त्या हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, दि 05/08/2020 रोजी अयोध्या येथे राम मंदिर भूमीपूजन होणार आहे. तरी सर्वानी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करावा. कुणीही एकमेकांच्या धार्मिक भावना दुखावतील आशा पोस्ट व्हाॅटसपवर शेयर करू नये.
जे कोणी समाजकंटक आक्षेपार्ह पोस्ट शेयर करतील त्यांचेवर नांदेड सायबर सेल व संबंधित पोलीस स्टेशनच्या गोपनीय शाखेची करडी नजर ठेवण्यात येणार आहे. जी व्यक्ती कोणाच्याही भावना दुखावनारी पोस्ट व्हाट्सऐप ,फेसबुक ट्विटर अगर कोणताही आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करील किंवा दुसऱ्याला फॉरवर्ड करील आशा समाज कंटकावर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल . तसेच व्हॅटसअप ग्रुप अडमिन यांना विनंती आहे की काही लोक हे धार्मिक भावना दुखवण्याच्या उद्देशाने किंवा अति उत्साहा मुळे पोस्ट शेयर करत असतात त्यामुळे ग्रुप अडमिन यांनी आज व उद्या सेटिंग मध्ये जाऊन msg send सेटिंग only admin करावी. कोणत्याही ग्रूप मधून अशा पोस्ट शेअर केल्याचे निदर्शनास आल्यास एडमिन ला सुद्धा जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.