भाजयुमोच्या कार्यकर्तांनी समर्पण भावनेतून कार्य करावे -खा.प्रतापराव पाटील चिखलीकर

अर्धापूर (प्रतिनिधी)

भाजयुमोच्या कार्यकर्तांनी जोमाने कार्य करावे तसेच जनतेच्या अडचणी सोडवणूक करण्यासाठी समर्पण भावनेतून कार्य करून युवा मोर्चाचे कार्य महाराष्ट्रात नांदेड जिल्हा अग्रेसर ठेवावा असे आवाहन भाजयुमोच्या आढावा बैठकीचे उध्दघाटक म्हणून भाषणात खा. चिखलीकर यांनी कार्यकर्तांना आढावा बैठकीत केले.


नांदेड जिल्हा ग्रामीण भाजपा युवा मोर्चाच्या पदवीधर व आढावा बैठक अक्षरांगण शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती या बैठकीचे उध्दघाटक म्हणून खा.प्रतापराव पाटील चिखलीकर होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस राहून लोणीकर,भाजपा नेते धर्मराज देशमुख,भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अँड किशोर देशमुख,
प्रदेश कार्यकारर्णी सदस्य राजेश देशमुख,भाजपा चिटणीस डॉ लक्ष्मण इंगोले,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन केले व दिप प्रज्वलित करून बंजारा समाजाचे गुरुवर्य रामराव महाराज यांना दोन मिनिटे सब्द राहून श्रध्दांजली वाहण्यात येऊन पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या वेळी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की भाजयुमोच्या पदाधिकारी व कार्यकर्तांनी जनतेच्या आपेक्षित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अग्रेसर राहून सेवा भाव जपावा महाराष्ट्र नांदेड जिल्हा युवा मोर्चा एक नंबर आणण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी असे आवाहन भाजयुमोच्या पदाधिकारांना खा. चिखलीकर यांनी केले.

या आढावा बैठकीत अध्यक्ष म्हणून विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे म्हणाले की युवा मोर्चाच्या पदाधिकारांनी प्रदेशांनी दिलेल्या कार्यक्रम यशस्वी करावा तसेच भाजयुमोचे संघटन मजबूत करून बूथ स्तरा पर्यंत पक्ष संघटन मजबूत करावे या साठी समर्पण करावे अशे आवाहन कौडगे यांनी केले.
तर भाजयुमोचे सरचिटणीस राहूल लोणीकर म्हणाले की भविष्यातील आवाहने लक्षात घेता भाजयुमोच्या पदाधिकारांनी सजग राहून जनतेला न्याय मिळवून द्यावा तसेच पदवीधर नोंदणी मोठ्या प्रमाणात करून मराठवाडा पदवीधर मतदार संघाची जास्तीत जास्त पदवीधरांची नोंदणी करावी अशे आवाहन भाजयुमोच्या अाढावा बैठकीत पदाधिकारांना केले या बैठकीत भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अँड.किशोर देशमुख यांनी तिन महिनांचा आढावा देऊन भविष्यात भाजयुमोचे कार्य जिल्हात एतच चर्चा भाजपा युवा मोर्चा ठेवण्याचे प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कल्याणकर,माजी जि.प.सदस्य रामराव भालेराव यांनी केले तर आभार विराज देशमुख यांनी मानले यावेळी जिल्हा सरचिटणीस रोहीत पाटील,बाबासाहेब हंबर्डे,बडू वडजे,देवा पाटील,पंकज देशमुख,परमेश्वर मुरकुटे,सानिद शंक्करवार,तेजेस मालदेडे,
निलेश गौर,महेश देशपांडे,श्रीकांत किन्हाळकर,अविनाश भोयर,उमाकांत क-हाळे,निलेश कवलगावकर,
तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी,शहराध्यक्ष विलास साबळे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा इंगोले,अवधूत कदम,योगेश हळदे,बैठक यशस्वी करण्यासाठी नगरसेवक जाधव,तालुकाध्यक्ष तुळशीराम बंडाळे,अंबादास आंबेगावकर,महेश देशमुख,बालाजी कानोडे,शिवकुमार दे.हानेगावकर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *