कंधार ; प्रतिनिधी
कंधार आगारातील वाहक एस पी ढेंबरे यांच्या मुलाने नीट परीक्षेमध्ये 720 पैकी 660 मार्क घेऊन जिल्ह्यात पाचवा क्रमांक मिळवला आहे त्याबद्दल चक्रधर ढेंबरे याचा दि.3 नोव्हेंबर रोजी सत्कार आगारातील कर्मचाऱ्यांनी केला.
राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा 2020 या नीट परीक्षेमध्ये कंधार आगारातील वाहक एस पी ढेंबरे यांचा मुलगा चक्रधर ढेंबरे या मुलाने 720 मार्क पैकी 660 गुण प्राप्त करून जिल्ह्यामध्ये पाचवा क्रमांक मिळवला यासाठी कंधार आगारात सर्व संघटना व कर्मचार्यांच्या वतीने दोघांचाही जाहीर सत्कार ठेवण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आगारप्रमुख हनुमंत ठाकुर यांच्या हस्ते एस पी ढेंबरे व चक्रधर ढेंबरे यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी चक्रधर ढेंबरे यांनी आपले मत व्यक्त केले.या यशाचे सर्व श्रेय आई वडिलांचे असल्याचे सांगितले .
यावेळी सहाय्यक वाहतूक निरीक्षक केजी केंद्रे ,वरिष्ठ लिपिक शेख खलील ,लेखाकार डिके केंद्रे, लिपिक सी एस श्रीमंगले, गोविंद शिंदे, सौ गीता अंबेकर ,एस के मठपती ,एसबी जोगे, मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे सचिव भगवान चव्हाण ,सुभाष मुसळे, दत्तात्रेय चोंडे, अंकुश कदम ,अंगत केंद्रे, शिवसेना संघटनेचे अध्यक्ष माधव तेलंग, सचिव मल्लिकार्जुन मस्तापुरे, काँग्रेस संघटनेचे नारायण ठाकूर, यासह चालक-वाहक मेकानिक प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.