कंधार ; प्रतिनिधी
कोविड-19 मुळे गेल्या सात महिन्या पासून कोचिंग क्लासेस बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच कोचिंग क्लासेस चालविणारा प्राध्यापक वर्ग, कर्मचारी हे आर्थिकदृष्टया अडचणीत आले असून त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
तेंव्हा शासनाकडून मिळणा-या विविध व्यवसायांना मिळणारी परवानगी लक्षात घेता कोविड- 19 चे सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता कोचिंग क्लासेस सुरु करण्याकरिता परवानगी मिळावी यासाठी कंधार तहसिलदार विजय चव्हाण व उपविभागीय अधिकारी बोरगावकर यांना कोचिंग क्लास संघटनेच्या वतीने निवेदन देवून मागणी करण्यात आली आहे.
यावेळी कोचिंग क्लास संघटनेचे अध्यक्ष प्रा. संभाजी मुंडे , आदित्य गव्हाणे , योगेश पा. नंदनवनकर, प्रा. ज्ञानेश्वर लोंढे , लक्ष्मणन विभुते, कुरुंदे ,प्रा. गजानन पांचाळ , प्रा. शिवा डांगे , योगेश मुंडे, विनोद बीजलगावे , पवन तुतुरवाड , नितीन जोंधळे , सोपान मुंडे आदीची यावेळी उपस्थिती होती.