कोरोना विषाणूने लादलेल्या अप्रिय पण अनिवार्य स्थानबध्दतेच्या काळात टिव्हीवर विनोद खन्नांचा ‘सुर्या’ नावाचा हिंदी सिनेमा बघण्याचा योग आला. त्यात एका प्रसंगात जिल्हाधिकारी असणारे डॉयलॉगकिंग राजकुमार जमीनदार असणाऱ्या खलनायक अमरिश पुरीला उद्देशून म्हणतात, ‘नौकर पालनेका शौक हो तो पहले मालिक बनना सिखो…’ कुठल्याही अस्थापनेत केवळ वय, पद, सेवाज्येष्ठता, पैसा या बाबी कुणालाही प्रतिष्ठा मिळवून देऊ शकत नाहीत तर उपजत कौशल्य, प्रामाणिकपणा, इमानदारी, सत्यवचनी बोली, बाणेदार स्वाभिमान, निस्वार्थी वृत्ती या गुणांमुळे आदर प्राप्त होतो. ‘रिसपेक्ट इज कमांडेड नॉन टू बी डिमांडेड’ एखाद्या कार्यालयात एका अधिकाऱ्यापेक्षाही एखादा कर्मचारी आदरशील व लोकप्रिय असू शकतो. सन्मान जेष्ठतेवर नाही तर गुणांवर ठरवला जातो. बुढे नही बडे बनिये.
पुर्वी खाजगी क्षेत्रात नौकरी करणारे बहुतांश लोक जिथे ज्वॉईन व्हायचे तिथुनच रिटायर्ड होत असत. काही ठिकाणी तर कित्येकांच्या तीन-चार पिढ्या एकाच मालकाकडे वारसाहक्क असल्यासारख्या टिकून राहत. आज हे चित्र फारसं दिसत नाही. ही एम्प्लॉयरची सत्ता व संपत्तीच्या आगतिकतेने प्रामाणिक आत्मियतेवर केलेली कुरघोडी की एम्प्लॉयीला सहज पर्याय उपलब्ध झाल्याने आलेला उताविळपणा हे मात्र कळेनासे झालंय. अर्थात विज्ञान-तंत्रज्ञानातील नवनवीन शोधामुळे व वाढत्या शैक्षणिक जागृतीमुळे बहुपर्यायांची उपलब्धता हाही घटक महत्वाचा आहे. पण व्यवस्थापनशास्त्रानुसार व्यवसाय उद्योगधंदे भरभराटीला येण्याच्या असंख्य कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण ‘रिटेंन्शन ऑफ स्टाफ’ आहे. आपल्याकडे ज्वॉईन झालेला नवखा कालांतराने अनुभवसंपन्न झाल्यावरही शेवटपर्यंत आपल्याकडेच राहतो की कायम अनअनुभवी नवख्यांचाच भरणा आपल्याकडे जास्त असतो यावरही आपल्या प्रगतीच्या बऱ्याच बाबी अवलंबून असतात. जेष्ठ अनुभवी व नव्या दमाचे तरुण हा बँलन्स व ताळेबंद लिलया जपता यायलाच हवा. काही महाभाग ‘माझ्याकडे वर्ष-दोन वर्षाच्या वर माणूसच टिकत नाही’ हे अभिमानाने सांगतात. माणूस टिकत नाही ही अभिमानाने सांगण्याची नसुन आत्मपरीक्षण करुन स्वतःत अमुलाग्र व नखशिखांत बदल जाणिवपुर्वक करुन घेण्याची बाब आहे, हे कळुनही न वळणे देखील दुर्दैवीच ना.? वारंवार बदलत्या स्टाफमुळे किंवा बदलत्या जबाबदारीमुळे व्यवस्थापन प्रणाली – मँनेजमेंन्ट सिस्टीम कोलमडून सगळाच खेळखंडोबा होऊ शकतो. अस्थापनेच्या व्यवस्थापनाबाबत कधीतरी, कुठेतरी ऐकण्या-वाचण्यात आलेलं एक वाक्य माझ्या कायम स्मरणात राहते, ‘जहाँ चोर झुठे फरेबी तरक्की करे और इमानदार अपमानित किया जाता हो, वहाँ विनाश अटल है।’
इंजि. शिवाजीराजे सुनिता भिमराव पाटील (नांदेड)
मास्टर कोच – जवाहरलाल नेहरु लिडरशिप इंन्स्टिट्युट (जेएनएलआय) नई दिल्ली
राष्ट्रीय अध्यक्ष – वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद (व्हिबिव्हिपी)
[email protected]