बेबीपंप : एका नव्या फॅशनचा उदय

बेबीपंप दाखविण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू झाला आहे. तसेच तो रुढ होत चालला आहे. भारतीय सांस्कृतिक परंपरेने स्रीयांचे नखही दिसणार नाही याची काळजी घेतली. परंतु आता आधुनिक स्त्रीत्वाच्या नावाखाली आणि पाश्र्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करत असतांना हे लोण कुठपर्यंत पोहचेल याबाबत काही बोलता येणार नाही. कारण आता शरीराचे सर्वच अवयव दाखवून झाल्यानंतर पुढील काळात सिनेमा, खेळ, माॅडेलिंग आदी क्षेत्रांतील प्रसिद्ध असलेल्या स्री किंवा पुरुष यांनी आपल्याच प्रणयक्रीडेचे फोटो किंवा व्हिडीओ तसेच जन्माला येत असलेल्या बाळाचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर न केले तरच नवल! कधी कोणते फॅड येईल ते सांगता येत नाही. आता सद्याच्या वातावरणात गरोदर असलेल्या स्रिया मोठ्या प्रमाणात आपल्या फुगलेल्या पोटाची फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करीत सुटल्या आहेत. एवढेच नव्हे तर त्या पोटावर मेहंदीही काढण्यात येत आहे. यापुढे जाऊन काही स्वयंघोषित शास्रज्ञ मुलगा होणार की मुलगी याबाबतचे तर्क – वितर्क लढवत आहेत.

अभिनय क्षेत्रच नव्हेतर क्रिकेटमध्येही हे लोण पसरले आहे.
टीम इंडियाच्या आॅलराऊंडर हार्दिक पंड्याची मंगेतर नताशा स्टानकोविच हिने लग्नाआधीच एका बाळाला जन्म दिला आहे.
हार्दिक पंड्या आणि क्रिकेटर नताशा स्टानकोविच या़ंचा १ जानेवारी २०२० रोजी साखरपुडा झाला होता. त्यापुर्वी लाॅकडाऊनमध्ये गरोदरपणाचे फोटो शेअर केले होते. पंड्या यांना बाप झाल्याबद्दल आयपीएल मुंबई इंडियन्ससह अनेकांच्या शुभेच्छाही मिळाल्या होत्या.

WWE ची प्रसिद्ध महिला पहिलवान की मशहूर महिला निकी बेला सोशल मीडियावर सतत कार्यरत असते. महशूर रेसलर जॉन सीना सोबत रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. बेबीपंपचे असहनशील फोटो टाकून तिच्या चाहत्यांचे ती मनोरंजन करीत होती. आणि तिच्या फोटो वेगाने व्हायरल होत होत्या.

कुमकुम भाग्य या मालिकेतील कलाकार शिखा सिंह हिनेसुद्धा आपल्या पोटाचे फोटो सगळ्यांना दाखवले आहेत. लाॅकडाऊन मध्ये सगळे आपल्या कुटुंबाला वेळ देत असतांना या अभिनेत्रींने हा काळ आपला बेबीपंप दाखवत मस्त एन्जॉय केलेला आहे. तसेच तिने आपल्याच नवऱ्याबरोबर रोमँटिक फोटोही शेअर केलेले आहेत.

प्रसिद्ध भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिने आपल्या गरोदरपणाचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या बेबीपंपचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर आहेत. तिने आपल्या गरोदरपणाबद्दल आधी काही सांगितले नव्हते. पण हे फोटो शेअर करताना तिने म्हटले आहे की, यावरुन समाजालाच काही ना काही शिकता येईल!

बॉलिवूडची बेबो म्हणजे अभिनेत्री करीना कपूर सध्या प्रेग्नेंसी एन्जॉय करते आहे. करीनाचा प्रेग्नेंसीचा सहावा महिना चालू असून आता बेबी बंप दिसतो आहे. या दरम्यान घरी आराम करण्याऐवजी ती कामात बिझी आहे. काही दिवसांपूर्वी ती आगामी चित्रपट लाल सिंग चड्ढाचे शूटिंग पूर्ण करून मुंबईला परतली आहे. मुंबईत आल्यानंतर तिने एका जाहिरातीचे शूटिंगदेखील केली आहे. नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत करीना कपूर खूप टाइट शिमरी ड्रेसमध्ये दिसते आहे. यात तिचे बेबी बंप दिसतो आहे. यासोबतच तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लोदेखील पहायला मिळतो आहे.

करीनाने नुकतेच मुलगा तैमूरसाठी घरी हॅलोविन पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी तैमूरचे मित्रदेखील उपस्थित होते. करीनाने या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तैमूरने आपल्या चेहऱ्यावर लाल रंग लावला आहे आणि एक ब्लॅक आउटफिट परिधान केले आहे. तैमूरचे फ्रेंडदेखील हेलोविन लूकमध्ये दिसत आहेत. करीनानेदेखील या पार्टीतील तिचे फोटो शेअर केले आहेत. यादरम्यान करीनाने जो ड्रेस परिधान केला आहे त्यात तिचा बेबी बंप स्पष्ट दिसतो आहे. करीनासोबत तैमूरच्या फ्रेंड्सच्या मम्मीदेखील दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत करीना कपूरने सांगितले होते की अशी कोणती गोष्ट आहे जी दुसऱ्या प्रेग्नेंसीमध्ये करायची नाही. करीनाने सांगितले की, तैमूरच्या वेळी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा सगळे मला खूप काही खायला सांगत होते आणि त्यामुळे माझे वजन २५ किलो वाढले होते. ते आता मला पुन्हा करायचे नाही. मला हेल्दी आणि फिट रहायचे आहे. 

करीनाच्या आधी अनेक अभिनेत्री यांनी असे केले आहे. परंतु बेबोच्या बातमी‌ची मराठी न्युज लिंक आली आणि आपले नेटीजन्स तुटुन पडले. या ठिकाणी काही प्रतिक्रिया दिल्या आहेत…

अ)बातमी देणाऱ्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे ❗ इतकी महत्त्वाची बातमी कव्हर केल्याबद्दल मैगसेसै पुरस्कार नक्कीच मिळाला पाहिजे ❓

इतक्या महत्वाच्या बातम्या दिल्या बद्दल मी आपला आभारी आहे डोळे भरून आले माझे
खरच महाराष्ट्राला अश्याच बातम्यांन ची खूप गरज आहे खूप छान अश्याच बातम्या देत जा धन्यवाद 🙏🙏🙏

आ) आमच्या शेजारच्या आजी मृत्यूशय्येवर होत्या,जीवाची घुसमट चालू होती,पण प्राण जात नव्हता! कशात जीव अडकला होता कोण जाणे ? आम्ही ही तुमची बातमी तिला सांगितली!
त्या म्हातारीने डोळे मिटून घेतले ते परत उघडलेच नाहीत! या बातमीने तादात्म्य पावली बिचारी !
😂😂😂😂

इ) त्यापेक्षा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची बायका पोर कशी जगतात हे लोकांसमोर आना गरीब शेतकऱ्यांची गरोदर बायको।पोटभर तरी जेवती का नाही ते जाऊन बघा कोरोनाच्या काळात किती नोकऱ्या गेल्या किती रस्त्यावर आले किती उपाशी मेले ते जरा बघा आणि जनतेसमोर सरकारसमोर मांडा सेलिब्रेटीच्या फडतूस बातम्या देण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेच्या बातम्या द्या त्या जास्त महत्वाच्या असतात

ई) भाऊ, बर झालं तू ही बातमी दिली, नाहीतर तिच्या काळजीपोटी मी गेले महिनाभर झोपलो नव्हतो.. thanks यार, आता तरी मला चांगली झोप लागेल तू दिलेल्या बातमीमुळे.. तुझे उपकार कसे फेडू हेच कळत नाहीये, तिची तब्येत विचारायला जाणार होतो पण सैफ येऊ देत नव्हता, आणखी एकदा मनपूर्वक आभार, आणि अश्याच उपयुक्त बातम्या देत जा

उ) 1) रात्री बेडवर झोपताना अभिनेत्रीने केली अशी हरकत – की ऐकून तुमचे होश उडतील
2) सलमानची ही गर्लफ्रेंड होती ऐश्वर्या पेक्षा सूंदर – फोटो पाहून हृदयाचे ठोके चुकतील
3) या राजकारण्यांची पत्नी आहे बॉलिवूड अभिनेत्री पेक्षा सुंदर
4) ब्रम्हदेशात सापडला घटोत्कचाचा सांगाडा – फोटो पहा
5) अमेरिकेतल्या या गावात दिसतात एलियन – फोटो फिचर
6) अमुक राजाच्या भाल्याचे वजन होते पाचशे किलो . इथे ठेवलाय भाला .
7) या अभिनेत्रीने तोडला चुंबनाचा विक्रम , फोटो पाहून आचंबित व्हाल
8) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हागरातैमुर दोन दिवसा पासुन खरकटाच आहे, फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क..
हे सगळं जपलं पाहिजे.

ऊ) अप्रतिम माहिती सर.👌
माझ्या आयुष्यात खूप नैराश्य होतो.नंतर मी आपली पोस्ट पाहिली माझं जीवन सुखी झालं.
त्यानंतर मी ही पोस्ट माझ्या काही मूळव्याधग्रस्त, मुतखडा, पोट साफ न होणाऱ्या काही मित्रांना दाखवली, त्यांचे सर्व त्रास दूर झाले.
ही पोस्ट वाचताच गावच्या सरपंचाला पोरगा होत नव्हता त्याला पोरगा झाला.
हा फोटो पाहिल्यानंतर गावच्या म्हशी पण गाभण राहिल्या, गावची जनावरे आनंदाने राहू लागली.
आम्ही सर्वजण खूप सुखी आहोत.
येड्यापूर गावातल्या एका माणसाने ही पोस्ट २१ जणांना शेअर केली आज त्यांच्या गावात मेंटल हॉस्पिटल आहे.
एकाला ही माहीती खोटी वाटली आणि पोस्ट डिलीट केली त्याला हगवणचा त्रास सुरू झाला शेवटी चड्डीतच …. तेव्हाच त्रास दूर झाला.

धन्यवाद.🙏

ए) आता फक्त थेट प्रक्षेपण दाखवु नका म्हणजे झालं trp च्या मागे लागून ही असली पत्रकारिता की चाय बिस्कीट वाली, जे वेळ मिळाला तर भ्रष्टाचार , देशात घडणारे अन्याय महिलांवरील अन्याय, शेतकरी अडचणी ,बेरोजगारी वर ही बातम्या द्या, हे असली प्रेग्नन्सी बातम्या ला महत्त्व कमी द्या

ऐ) का करणार नाही, बापजादे करोडोची इस्टेट सोडून गेले आहेत, स्वतः धंदा करून, अंग दाखवून करोडो कमावले आहेत, अर्ध्या वयाचा नवरा मिळाला तोही अब्जोपती.!!!
तिला हक्कच आहे. एन्जॉय कर बापडी.!!
इथे शेतकरी मेला काय किंवा जगला काय.?
मीडिया कव्हरेज तर ह्यानंच मिळणार आहे ना.?

ओ) जे दाखवयाच आहे ते दाखवा ना
शेतकरी आत्महत्या करतो ते दाखवा .
मागच्या कालखंडा मध्ये पावसाने शेतकऱ्याच्या पिकाचे 3- १३ केले ते दाखवा .
अद्यापही काही ठिकाणी नवीन पिककर्ज मिळत नाही ते दाखवा .
सिमेवर जवान शहीद होतो ते दाखवा .
कोण कोवीड – १९ मध्ये कोण कोणत्या संस्था , व्यक्ती सामाजीक कार्य करतो ते दाखवा .
तुम्हाला दाखवयाच खुप काही आहे . मंग तुम्ही ते का? दाखवत नाही राव ..

औ)गेल्या ८ महिन्यात राज्यात २० वर्षे मधील सगक्यात जास्त आत्महत्या झाल्या उत्तर प्रदेश मधील हतरस सारख्या ४७ घटना घडल्या पण हे दाखवणार नाहीत चहा बिस्कीट साठी पण अश्या फालतू गोष्टी दाखवणार आणि इतर राज्यातील घटना दाखवणार पण आपल्या इथे काय घडत आहे हे झाकून ठेवणार

अं) ती काही करो अम्हला काय करायचं आणि तुम्हाला हीच न्यूज राहिली का दाखवायला काही देश हिताचं ते सांगा की तिला दिवस गेले ही बातमी काय संजीची आहे का शेतकरी कशा जगतोय हे नाही दिसणार तुम्हाला ती प्रेग्नेंट आहे आम्हाला काय करायचं

अ:) ही उच्चकुलीन, धनवान,अप्रतिम सौंदर्यवती , टाॅपची अभिनेत्री…असे सगळे सर्वसंपन्न जीवन असताना एका वयस्कर अभिनेत्याची दुसरी बायको होऊन मुले पैदा करण्याची हिला दुर्बुध्दी का झाली असेल ?

बेबी पंप दाखविणे हा निर्लज्जपणा आहेच परंतु सर्वांग सुंदर असलेल्या भारतीय संस्कृतीचा अशा प्रकारे थोड्या थोड्याने ऱ्हास होत चालला आहे. झाकून का होईना पण भारतात घरंदाज स्रिया गरोदरपणातील पोटावर मेहंदी काढून घेत आहेत. त्या कालांतराने सोशल मीडिया नामक भ्रामक संस्कृतीच्या बळी पडू शकतात. हे लोण खेड्यापाड्यापर्यंत पोहचेल का?

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय/
४.११.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *