कंधार तालुक्यातील कौठा येथिल शेतकऱ्यांना ऊस उत्पादन ,लागवड संदर्भात आशाताई शिंदे यांनी केले मार्गदर्शन;गूळ कारखाना सभासद नोंदणीचे स्वागत

कंधार ; प्रतिनिधी

आशा फार्मस प्रोड्युसर कंपनी हाळदा ता.कंधार जि. नांदेड गूळ कारखाना सभासद नोंदणी शुभारंभ कार्यक्रम आज दि.३ रोजी कौठा ता.कंधार जि.नांदेड येथे सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

आशाताईंनी जगतजोती महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष बळीराम पावडे होते. शेतकऱ्यांना योग्य असे ऊस उत्पादन,लागवड संदर्भात आशाताईनी मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.या कार्यक्रमासाठी श्री डॉ. मोहनराव कल्याणकर यांचे उसलागवड ,हळद,सोयाबीन,कापूस या पिकाची लागवड व जोपासना या विषयी मार्गदर्शन झाले याप्रसंगी माधव पा. घोरबांड,योगेश पा. नंदनवनकर,अशोक पा. कळकेकर,मोहन कल्याणकर,शंकरसिह लाला,निळकंठ कौशल्ये,काटकळंबा सरपंच राष्ट्रापाल चावरे,ओम ठाकूर, कार्यक्रमाप्रसंगी
परिसरातील शेतकरी,ऊस उत्पादक शेतकरी व नागरिक यांनी मोठ्या संख्यने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजक-
बसवेश्वर विश्वनाथराव मडके प्रफुल्ल विश्वनाथराव येरावार यांनी अतिशय सुंदर कार्यक्रमाचे नियोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *