लोहा येथिल उपजिल्हा रूग्णालयला शहिद जवान संभाजी कदम यांचे नाव द्या -युवक काँग्रेसची मागणी

लोहा येथिल उपजिल्हा रूग्णालयलाशहिद जवान संभाजी कदम यांचे नाव द्या -युवक काँग्रेसची मागणी  

 लोहा ; विनोद महाबळे


उपजिल्हा रूग्णालय लोहा येथेशहिद जवान संभाजी कदम यांचे नाव देण्यात यावे या अनुषंगाने लोहा तहसीलदार तहसील कार्यालय लोहा व मुख्य अधिकारी नगर पालिका लोहा यांना युवक काँग्रेसच्या वतीने दि.४ अॉगस्ट रोजी निवेदन देण्यात आले.
लोहा तालुक्यातील जानापुरी येथिल भुमिपूत्र जवान संभाजी कदम यांना देशसेवा करताना विरमरण आले.ते शहीद झाले.त्यांच्या विरगाथेची ओळख व स्मरण म्हणून लोहा येथिल उपजिल्हा रूग्णालयास शहिद जवान संभाजी कदम यांचे नाव देण्यात यावे म्हणून तहसीलदार परळकर  तहसील कार्यालय लोहा व मुख्य अधिकारी नगर पालिका लोहा यांना युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देवून मागणी करण्यात आली.यावेळी  काँग्रेस पक्षाचे नेते सतीश देवकत्ते , अजय मोरे, बाबासाहेब बाबर, सतीश नळगे, पांडूरंग शेट्टे, परीहर साहेब, स्वप्नील परोडवाड, ऋषीकेश बसवंते, पवार , चंदू जोंधळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *